Maratha Andolan: अजित पवार आपल्या आमदारांसह घेणार जालन्यात मराठा आंदोलनकर्त्यांची भेट
जालन्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा समाजाच्या आंदोलकांवर लाठीमार झाल्याने अजित पवार शिवसेना आणि भाजपवर नाराज असल्याचं सांगण्यात येत आहे.
जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जच्या घटनेचे मुळे मोठी खळबळ उडाली आहे. राज्यभरात या घटनेमुळे पडसाद उमटून दिसत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार लवकरच आपल्या सगळ्या आमदारांसह आंदोलकांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. अजित पवार गटाची मराठा आरक्षण मिळावी हीच भूमिका असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अजित पवार आमदारांसह आजच आंदोलन स्थळी जाऊन भेट घेणार होते. मात्र कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो यासाठी आजची भेट टाळली असल्याचं सांगण्यात येत आहे. (हेही वाचा - Jalna Lathicharge: सरपंचाने स्वत:चीच गाडी पेटवली, जालन्यातील लाठीचारचा केला निषेध (Watch Video))
जालन्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा समाजाच्या आंदोलकांवर लाठीमार झाल्याने अजित पवार शिवसेना आणि भाजपवर नाराज असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांनी आपले 2 दिवसांचे नियोजित तीन कार्यक्रम रद्द केल्याने या चर्चांना उधाण आले आहे. पुणे, पिंपरी आणि बुलडाणा येथील त्यांचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. यासोबतच शासन आपल्या दारी या कार्यक्रमातही अजित पवार गैरहजर होते.
अजित पवार आज मुख्यंमत्र्यांसोबत शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. मात्र अचानक त्यांनी आपला दौरा रद्द केला. यावरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले आहेत की, ''अजित पवार यांची तब्येत बरी नाही. दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर आहेत.