Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत काही पक्षांकडून राजकीय षडयंत्र केले जात आहे; अशोक चव्हाण यांचा आरोप
यातच मराठा आरक्षणाबाबत काही पक्षांकडून राजकीय षडयंत्र केले जातंय ज्यांना ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद लावून त्याचा राजकीय फायदा उठवायचा आहे, असा गंभीर आरोप मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी केला आहे.
मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) महाराष्ट्राचे राजकारण अधिक तापल्याचे दिसत आहे. यातच मराठा आरक्षणाबाबत काही पक्षांकडून राजकीय षडयंत्र केले जातंय ज्यांना ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद लावून त्याचा राजकीय फायदा उठवायचा आहे, असा गंभीर आरोप मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी केला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आज त्यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती त्यावेळी ते बोलत होते. मराठा आरक्षणाबाबत महाविकास आघाडीचे सरकार हातबल नाही. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने कायदेशीर प्रश्न निर्माण झाला आहे. न्यायालयीन प्रक्रियेमध्ये सरकारला काही मर्यादा आहेत. त्यामुळे आमच्या पद्धतीने जे शक्य आहे ते आम्ही करतो आहोत, असेही ते म्हणाले आहेत.
'मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण देण्याचा प्रश्नच येत नाही. तरीही काही गैरसमज पसरवत आहेत. मराठा आणि ओबीसींमध्ये वाद लावण्याचे काही राजकीय पक्षांचे षडयंत्र आहे. या आंदोलनांमध्ये कोणत्या पक्षाचे लोक आहेत हे तुम्ही पाहा. मागच्या सरकारने मराठ्यांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. आमच्या सरकारचीही तीच भूमिका आहे. मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण देण्यावर आमचा भर आहे. त्यामुळे ओबीसींच्या आरक्षणात ढवळाढवळ करण्याचा प्रश्नच येत नाही, असे अशोक चव्हाण म्हणाले आहेत. हे देखील वाचा-Coronavirus In Maharashtra: महाराष्ट्रात कोरोना व्हायरसची दुसरी लाट येण्याची शक्यता कमी- आरोग्यमंत्री राजेश टोपे
मराठा आरक्षणाबाबत घटनापीठ स्थापन करण्याच्या राज्य शासनाच्या अर्जावर लवकरात लवकर निर्णय घेणार असल्याचे सरन्यायाधिशांनी सर्वोच्च न्यायालयात सांगतिले आहे. मराठा आरक्षणप्रकरणी शासनाचे वकील व जेष्ठी विधीज्ञ मुकूल रोगतगी यांच्या यासंदर्भातील विनंतीनंतर सरन्यायाधिशांनी हे सतोवाच केली आहे, अशी माहिती अशोक चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.