Maratha Reservation Bill: मराठा आरक्षण विधेयकावर अजित पवार, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया
यामध्ये सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षाचे नेत्यांचाही समावेश आहे. जाणून घ्या कोणत्या नेत्याने काय प्रतिक्रिया व्यक्त केली.
मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय राज्य विधिमंडळाने एकमताने घेतला. त्यामुळे मराठा आरक्षण (Maratha Reservation) प्रश्न निकाली निघाल्याचा आभास प्रथमदर्शनी तरी तयार झाला आहे. असे असले तरी हा निर्णय कोर्टात टिकणार का? याबाबत अनेकांनी शंका उपस्थित केल्या आहेत. दस्तुरखुद्द मराठा आंदोलकांचे सध्याचे प्रणेते मनोज जरांगे पाटील यांनीही राज्य सरकारच्या या निर्णयाबाबत फारसे समाधान व्यक्त केले नाही. राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणि सरकारसमर्थकांनी या निर्णयाबद्दल जोरदार आनंद व्यक्त केला आहे. दुसऱ्या बाजूला विरोधी पक्षनेत्यांनी मात्र सावध भूमिका व्यक्त केली आहे. जाणून घ्या विधानसभेतील विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार, अजित पवार (Ajit Pawar), काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole), बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांच्यासह राजकीय नेत्यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया.
मराठा समाजाचं मनापासून अभिनंदन- अजित पवार
शिक्षणात आणि रोजगारात 10 टक्के आरक्षण देण्याचं मराठा आरक्षण विधेयक राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमतानं मंजूर करण्यात आलं, ही अतिशय आनंदाची बाब आहे. विशेष म्हणजे सर्व त्रुटी दूर करून हे आरक्षण देण्यात आलं आहे. मराठा समाजाचं मनापासून अभिनंदन करतो. हे आरक्षण मंजूर करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी हातभार लावला त्या सर्वांचे आभार, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Maratha Reservation: मराठा समाजाला शिक्षण, नोकरीत 10% आरक्षण; विधेयक एकमताने मंजूर)
एक्स पोस्ट
मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही काँग्रेसची इच्छा: नाना पटोले
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी आमची इच्छा होती. आम्ही नेहमीच पाठिंबा दिला आहे. बैठकीत ओबीसी आरक्षणाला हात लावू नये, अशी चर्चा झाली. आम्ही पाच जणांना आरक्षण दिले होते. विधानसभा अध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांना सभागृहात चर्चा सुरु होण्यापूर्वीच आम्ही पाच प्रश्न दिले होते. त्यातील एकाही प्रश्नावर सरकारने भाष्य केले नाही, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. (हेही वाचा, Manoj Jarange Patil on Maratha Reservation: मनोज जरांगे पाटील आंदोलनावर ठाम, ‘10% मराठा आरक्षण देऊन सरकारने फसवणूक केली’)
व्हिडिओ
मराठा आरक्षणास पाठिंबा, केवळ ओबीसीमध्ये घेण्यास विरोध- छगन भुजबळ
आज एकनाथ शिंदे सरकारने स्वतंत्र आरक्षणाचा कायदा केला आणि आम्ही त्याला पाठिंबा दिला. आम्ही एवढेच म्हणतोय की मराठा आरक्षणाचा ओबीसीमध्ये समावेश करू नये. आता तुम्हाला 10% मराठा आरक्षण मिळाले आहे. मनोज जरंगे पाटील म्हणत आहेत की त्यांना ओबीसी, कुणबी, ईडब्ल्यूएस आणि मराठा अंतर्गत आरक्षण हवे आहे. त्यांना कायदा, सुव्यवस्था आणि संविधान समजत नाही. आरक्षण हा गरीब हटाओ कार्यक्रम नाही. त्यांनी जाळपोळ केली. आमदारांची घरे आणि हॉटेल्स. भीतीचे वातावरण निर्माण झाले, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ मराठा आरक्षण विधेयकावर बोलताना म्हणाले
व्हिडिओ
विरोधकांच्या सूचनांची राज्य सरकारने दखल घेतली नाही- पृथ्वीराज चव्हाण
हे विधेयक संमत व्हावं अशी आम्हा सर्वांना इच्छा होती. आम्ही सर्व एकमताने या विधेयकाला पाठिंबा देत होतो. शिवाय 2014 आणि 2018 प्रमाणेच हे विधेयकही तंतोतंत तसंच आहे. वेगळे काय आहे? सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयात हा कायदा नाकारला जाणार नाही, यासाठी त्यांनी कोणती खबरदारी घेतली आहे, याची खात्री सरकार देऊ शकले नाही. आमचे म्हणणे मांडण्यासाठी न्यायमूर्ती दिलीप भोसले (निवृत्त) यांनी काही सूचना केल्या. त्यांची दखल घेण्यात आली आहे का? तसेच या संपूर्ण कायद्याचा आणखी एक अप्रत्यक्ष फायदा म्हणजे मराठा समाजाला यापुढे 10% EWS आरक्षण मिळणार नाही. त्यांना UPSC परीक्षेला बसण्यासाठी आता त्यांना 10% EWS ऐवजी फक्त मिळेल. आता त्यांना 10% राज्य आरक्षण मिळेल. हा फरक आहे, असे काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.
व्हिडिओ
आरक्षणाचा निर्णय घेताना सरकारने मराठा समाज आणि विरोधकांना विश्वासात घेतले नाही- अमित देशमुख
मराठा समाजाला शैक्षणिक आणि शासकीय नोकऱ्यांत 10 टक्के आरक्षण देण्यासंदर्भातील विधेयक आज महाराष्ट्र विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर झाले आहे ही आनंदाची बाब आहे,मात्र हे विधेयक मंडण्यापूर्वी सरकारने विरोधी पक्ष आणि मराठा समाजालाही विश्वासात घेतलेले नाही, अशी भावना अमित देशमुख यांनी व्यक्त केली आहे.