मनसुख हिरेन यांचा मृत्यू आणि मुकेश अंबानीं च्या घरावजवळ स्फोटकांनी भरलेल्या कार प्रकरणातील दोषीची गय केली जाणार नाही- गृहमंत्री अनिल देशमुख

मात्र त्याच्या काही दिवसांनी ही कार मनसुख हिरेन (Mansukh Hiren) यांची असल्याचे समोर आले.

Anil Deshmukh (Photo Credits: ANI)

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या अॅन्टेलिया निवासस्थानी एक स्फोटकांनी भरलेली कार आढळल्याने खळबळ उडाली होती. मात्र त्याच्या काही दिवसांनी ही कार मनसुख हिरेन  (Mansukh Hiren) यांची असल्याचे समोर आले. परंतु हिरेन यांची चोरीला गेल्याची तक्रार त्यांनी पोलिसात सुद्धा केली होती. पोलिसांकडून त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात येत होते. परंतु पोलिसांकडून त्यांना एखादा गुन्हेगार असल्याची वागणूक दिली जात असल्याचे मनसुख यांनी बोलून दाखवले. या सर्व प्रकारातच मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा खाडीजवळ आढळल्याने खळबळ उडाली गेली. त्यामुळे आता या दोन्ही प्रकरणांना एक वेगळेच वळण लागले आहे. अशातच आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मनसुख हिरेन आणि मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेल्या कार प्रकरणातील दोषींना सहजासहजी सोडले जाणार नाही असे स्पष्ट केले आहे.

मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्युमुळे NIA कडे हे प्रकरण द्यावी अशी  मागणी  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यानंतर आता हे प्रकरण ATS कडे सोपवण्यात आले असल्याचे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. तर महाराष्ट्र पोलिस सक्षम असल्याने हा तपास महाराष्ट्राच्या ATS कडे सोपवण्यात आला आहे.(Mansukh Hiren Death Case चा तपास ATS तर स्फोटकं सापडल्या प्रकरणाचा तपास NIA करणार)

दरम्यान, 25 फेब्रुवारी रोजी मुकेश अंबानी यांचे निवासस्थान अन्टीला जवळ एक अज्ञात स्कॉर्पिओ आढळली होती. या स्कॉर्पिओमध्ये 2.5 किलोग्रॅम जिलेटीन स्फोटक सापडले होते. तसंच या गाडीत असलेल्या पत्रात अंबानी यांच्या कुटुंबियांना धमकी देण्यात आली होती. त्यानंतर ही गाडी चोरीची असून या गाडीचे मालक मनसुख हिरेन असल्याचे समोर आले होते. परंतु, ही कार नेमकी कोणी पार्क केली याबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही.