Manoj Jarange Patil: लढायचं नाही, पाडायचं! मनोज जरांगे पाटील यांची विधासभा निवडणुकीतून माघार

'राजकारण हा आमचा खानदानी धंदा नाही' असे सांगत मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे.

Manoj Jarange Patil | (Photo credit: archived, edited, representative image)

मराठा आरक्षण (Maratha Reservation) मुद्द्यावरुन उपोषण आणि आंदोलन करत असल्याने चर्चेत असलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी विधानसभा निवडणूक 2024 (Vidhan Sabha Election) मधून सपशेल माघार घेतली आहे. आयोजित पत्रकार परिषदेद्वारे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना सोमवारी (4 नोव्हेंबर) सकाळी त्यांनी ही घोषणा केली. केवळ जातीच्या आधारे निवडणुकीत उतरता येणार नाही. त्यामुळे आपण समर्थक आणि मराठा समाजास कोणासही पाठिंबा देण्यास किंवा काढण्यास सांगणार नाही. त्यातच आमच्या मित्रपक्षांची यादीही आली नाही. त्यामुळे आंदोलन कायम सुरुच राहील. मात्र, जनतेने कोणाचाही उघड प्रचार करु नये. गुपचूप जावे आणि मतदान केंद्रावर मतदान करुन बाहेर यावे. मनात असेल त्याला निवडून आणावे आणि पाडावे, अशी भूमिका जरांगे पाटील यांनी व्यक्त केली आहे.

निवडणुकीतून अचानक माघार

मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणूक 2024 च्या पार्वभूमीवर घेतलेली भूमिका वेळोवेळी बदलत आली आहे. कालही (3 ऑक्टोबर) त्यांनी कोणकोणत्या ठिकाणी उमेदवार उभे करणार याबाबत माहिती दिली होती. दरम्यान, अवघ्या 24 तासात त्यांनी वेगळी भूमिका घेत थेट निवडणुकीतूनच माघार घेतली आहे. आज ते उमेदवारांची नावे जाहीर करता काय, याबात उत्सुकता असतानाच त्यांनी अचानकच वेगळा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे त्यांच्या भूमिकेची राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा सुरु आहे. एकही उमेदवार जाहीर न करणे हे अनेकांसाठी अनाकलनीय ठरत आहे. (हेही वाचा, Manoj Jarange Patil Death threat: मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क)

विधानसभा निवडणूक प्रक्रियेनुसार दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आजची शेवटची मुदत आहे. आज दुपारी तीन वाजेपर्यंत हे अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यामुळे मनोज जरांगे पाटील हे आज कोणकोणत्या मतदारसंघांतून उमेदवार जाहीर करणार याबातब उत्सुकता होती. मात्र, आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले, निवडणूक लढविणे, जिंकणे हा काही आमचा खानधानी धंदा नाही. आम्ही दलित आणि मुस्लीम उमेदवारही उभा करणार होतो. पण, आम्ही राजकारणात नवीन आहोत. त्यामुळे आम्ही एखादा जातीवर आधारीत उमेदवार दिला आणि तो निवडणुकीत पराभूत झाला तर संपूर्ण समाजाची लाज जाईल. केवळ एका जातीवर निवडणूक जिंकणे किंवा पुढे जाणे शक्य नाही. त्यामुळे आम्ही लढायचे नाही, तर पाडायचे असा निर्णय घेतला आह, असे ते म्हणाले. (हेही वाचा, Assembly Elections 2024: बंडखोर पक्षादेश पाळणार? उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आज शेवटचा दिवस)

दरम्यान, मनोज जरांगे नावाचे वटवाघूळ नेहमची अशी भूमिका घेते. उगाच याला पाडा, त्याला गाडा, बघून घेऊ, पाहून घेऊ, अशी लोकशाही विरोधी आणि हुकुमशाही प्रवृत्तीची भूमिका ते घेत असतात, अशी टीका प्रा. लक्ष्मण हाके यांनी जरांगे यांच्यावर केली आहे. ते खासगी वृत्तवाहिनीशी बोलत होते.