Chembur Murder: धक्कादायक! मित्राचे भांडण मिटवण्यासाठी गेलेल्या तरुणाची चाकू भोकसून हत्या; चौघांना अटक

ही घटना चेंबूर (Chembur) येथील हॉटेल अॅम्ब्रॉलजवळील नॅशनल हासस्कूल समोर शुक्रवारी घडली आहे.

crime I mage only representative purpose (Photo credit: pxhere)

मित्राचे भांडण मिटवण्यासाठी मध्यस्ती पडलेल्या एका तरूणाची हत्या करण्यात आल्याची घटना उघसकीस आली आहे. ही घटना चेंबूर (Chembur) येथील हॉटेल अॅम्ब्रॉलजवळील नॅशनल हासस्कूल समोर शुक्रवारी घडली आहे. याप्रकरणी चेंबूर पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अक्षय राजू देसाई, असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. अक्षय हा आपल्या भावासोबत जात असताना चारही आरोपी त्याच्या मित्राला मारहाण करत असल्याचे त्याला दिसले. त्यावेळी भांडण सोडवणे अक्षयच्या जीवावर बेतले असून या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे.

अमर सुशील सिंह (वय, 20), अजय धर्मालिंगम स्वामी (वय, 29), रमण गोविंदराज शेट्टी (वय, 22), विशाल बाळू जाधव (वय, 22) असे हत्या करणाऱ्या आरोपींचे नाव आहेत. यापैकी अजय स्वामी सेक्युरिटी गार्डचे काम करत असून इतर सर्वजण बेरोजगार असल्याचे समजत आहे. मिळलेल्या माहितीनुसार, अक्षय हा शुक्रवारी सायंकाळी आपल्या भावासोबत जात असताना त्याचा मित्र गणेश लोकरे आणि वरील चारही आरोपी यांच्यात आर्थिक देवाणघेणाणीवरून वाद सुरु होता. त्यावेळी अक्षय भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, चौघांनी अक्षयला शिवीगाळ करून मारहाण केली. त्यानंतर अमर सिंहने आपल्या जवळ असलेल्या चाकू अक्षयच्या पोटात भोकसून हत्या केली आहे. हे देखील वाचा- Mira Road: नवऱ्याने टक्कल असल्याचे लपवल्याने नवविवाहित महिलेची पोलिसांत तक्रार; मिरा रोड येथील घटना

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील सर्व आरोपी चेंबूर परिसरातीलच आहेत. त्यावेळी चारही आरोपींनी दारुचे सेवन केले होते. तसेच मृत आणि आरोपी एकमेकांना ओळखतात, असे पोलीस चौकशीतून उघड झाली आहे.