धक्कादायक! जेवणात मटन वाढले नाही म्हणून पतीकडून पत्नीची जाळून हत्या

यात पत्नीचा मृत्यू झाला आहे. ही घटना नवीमुंबई (New Mumbai) येथील कामाठीपूरा (Kamathipura)येथे घडली.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

जेवणात कमी मटन वाढल्यामुळे संतापलेल्या पतीने आपल्या पत्नीला पेटवून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यात पत्नीचा मृत्यू झाला आहे. ही घटना नवीमुंबई (New Mumbai) येथील कामाठीपूरा (Kamathipura)येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी अरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पीडित महिलेवर गेल्या अनेक दिवसांपासून सायन रुग्णालयात उपचार सुरु होते. परंतु, या घटनेत संबंधित महिला अधिक भाजली असून 9 डिसेंबर रोजी तिने रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. तसेच घटनेनंतर आजुबाजुच्या परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.

पल्लवी सरोडे असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. पल्लवी आणि आरोपी मारुती सरोडे हे दोघेही पत्नी-पत्नी आपल्या 4 मुलांसह नवी मुंबईतील कमाठीपूरा येथे राहत होते. आरोपी मारुतीने 4 डिसेंबर रोजी मटन आणून पल्लवीला बनवायला सांगितले होते. त्यानुसार, स्वयंपाक झाल्यानंतर पल्लवीने जेवण वाढण्यास सुरुवात केली. त्यावेळी पल्लवीने मारुतीच्या थाळीत कमी मटन वाढले होते. यामुळे मारुती संतापला. त्यानंतर त्याने आपल्या पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले. ही घटनेची आजुबाजूच्या लोकांनी पीडितेला नेरूळच्या रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पीडितेला सायन रुग्णालयात हलवण्यात आले होते. त्यानंतर 9 डिसेंबर रोजी पीडितेने सायन रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. हे देखील वाचा- धक्कादायक! सासूकडून एनआरआय सुनेची हत्या; पोलिसांत कबूली देण्यासाठी नेला हात कापून

वरिष्ठ पोलीस बाबासाहेब टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीच्या पत्नीने 4 डिसेंबर रोजी जेवणात कमी मटन वाढल्यामुळे पती संतापला. ज्यावेळी आरोपीने संबंधित महिलेला जाळण्याचे कृत्य केले. त्यावेळी आरोपीने मद्यपान केल्याची माहिती समोर आली. आरोपीने पीडिताला पेटवून दिल्यानंतर त्यांच्या मुलांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली. त्यानंतर शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif