Mumbai: पोटच्या मुलीवर बलात्कार आणि नातीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एकास जन्मठेपेची शिक्षा

पोटच्या मुलीवर बलात्कार (Rape) आणि अल्पवयीन नातीवर लैंगिक अत्याचार (Sexually Abused) केल्याप्रकरणी एका 65 वर्षीय व्यक्तीला विशेष कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा (Life Imprisonment) सुनावली आहे.

प्रतिकात्मक फोटो (Photo : FilePhoto)

पोटच्या मुलीवर बलात्कार (Rape) आणि अल्पवयीन नातीवर लैंगिक अत्याचार (Sexually Abused) केल्याप्रकरणी एका 65 वर्षीय व्यक्तीला विशेष कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा (Life Imprisonment) सुनावली आहे. ही घटना 2017 मध्ये मुंबईच्या (Mumbai) भांडूप (Bhandup) येथे घडली होती. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली होती. पीडिता आपल्या मुलीसह माहेरी गेली असताना तिच्या मुलांना जीवे मारण्याची धमकी देत आरोपीने तिच्यावर बलात्कार केला होता. या घटनेला एक महिना उलटला नाहीतर, आरोपीने पीडिताच्या मुलीवरही लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार स्थानिक पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. त्यानंतर आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडिता मे महिन्यात आपल्या आईला भेटायला गेली होती. त्यावेळी आरोपीने तिच्या मुलांना जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केला होता. त्यानंतर जुलै महिन्यातही आरोपीने तिच्यावर बलात्कार केला, अशी तक्रार पीडिताने भांडूप पोलीस ठाण्यात दाखल केली होती. सुनावणी दरम्यान फिर्यादीने नऊ साक्षीदारांची तपासणी केली. तथापि, आरोपींनी दावा केला आहे की, त्याच्या मुलीने कुटुंबासह मालमत्तेच्या वादावरून त्याला चुकीच्या पद्धतीने फसवण्यासाठी खोटी फिर्याद दिली आहे. हे देखील वाचा- Bhandup Fire: भांडुप येथील मॉलला लागलेल्या आगीत दोन जणांचा मृत्यू, अग्निशमन दलाकडून बचाव कार्य अद्याप सुरु

विशेष कोर्टाच्या न्यायधीश रेखा पांढरे यांनी भारतीय दंड विधेयक कमल 376 (2) आणि लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण कायद्यातंर्गत (पोक्सो) दोषी ठरलेल्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

देशात महिला अत्याचार आणि अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या बलात्काराचं सत्र थांबायला तयार नाही. देशातील विविध कोपऱ्यातून दररोज हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना समोर येत आहेत. महत्वाचे म्हणजे, घरातही सुरक्षित नसल्याचे दिसत आहे.