टिटवाळा स्थानकामध्ये एका व्यक्तीकडून 1.71 कोटीची सोन्याची बिस्किटं आणि बेहिशोबी रक्कम ताब्यात

त्याच्या पाठीवर असणारी बॅकपॅक तपासली तेव्हा त्याच्याकडे 56 लाखाची रक्कम आढळली. सोबत दोन सोन्याची बिस्किटं देखील सापडली.

Pure Gold | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

बेहिशोबी रक्कम आणि दोन सोन्याची बिस्किटं अशा एकूण 1.71 कोटीच्या मालमत्तेसोबत एका प्रवाशाला टिटवाळा स्टेशन (Titwala Station) वर ताब्यात घेण्यात आले आहे. आरपीएफ जवानाने (RPF Jawan) दिलेल्या माहितीनुसार, या व्यक्तीला रक्कम आणि सोन्याच्या बिस्किटांसह पुढील तपासासाठी आयकर विभागाकडे सोपवण्यात आले आहे.

रेल्वे प्रोटेक्शन फोर्स च्या टीम कडून गणेश मोंडल नामक व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले. 1 ऑक्टोबरच्या दिवशी हा व्यक्ती टिटवाळा स्थानकावर संशयास्पद परिस्थितीमध्ये भटकत होता. त्याच्या पाठीवर असणारी बॅकपॅक तपासली तेव्हा त्याच्याकडे 56 लाखाची रक्कम आढळली. सोबत दोन सोन्याची बिस्किटं देखील सापडली. त्यांची किंमत 1,15,16,903 इतकी आहे. दरम्यान अधिकार्‍यांनी अशी देखील माहिती दिली आहे ज्यामध्ये मोंडल याने या पैसे आणि सोन्याच्या सोर्स बाबत समाधानकारक उत्तरं दिलेली नाहीत. हे देखील नक्की वाचा: चालत्या Train मधून उतरणे महिला प्रवाशाला पडले महागात, RPF जवानाच्या तत्परतेमुळे वाचले तरुणीचे प्राण, पहा व्हिडीओ .

मोंडलने आरपीएफ अधिकार्‍याला दिलेल्या माहितीमध्ये तो लखनौ वरून पुष्पक एक्सप्रेसने आला अशी माहिती दिली. त्यानंतर त्याची केस आयकर विभागाला कळवून त्यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली.