Rape In Mumbai: मुंबई येथे दहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार; आईच्या तक्रारीनंतर जन्मदात्या पित्याला अटक

मुंबईत पोटच्या दहा वर्षीय मुलीवर बलात्कार (Rape) केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी नराधम बापाला अटक केली आहे.

Representational Image | (Photo Credits: File Photo)

बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. मुंबईत पोटच्या दहा वर्षीय मुलीवर बलात्कार (Rape) केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी नराधम बापाला अटक केली आहे. पीडिताचे आई-वडील गेल्या चार वर्षांपासून वेगळेवेगळे राहत आहेत. परंतु, पीडित ही आरोपी पितासह मुंबई येथे राहत होती. दरम्यान, सुरत येथे आपल्या आईला भेटायला गेली असताना पीडिताने आपल्या खाजगी भागातील वेदनाबद्दल सांगितले. त्यावेळी तिच्या आईने तिला रुग्णालयात घेऊन गेली. तिथे तिच्यावर बलात्कार झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर पीडिताच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर नराधम पित्याला अटक करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडिताने तिच्या खाजगी भागात होणाऱ्या वेदनाबद्दल तिच्या आईला सांगितले होते. त्यानंतर पीडिताच्या आईने तिला डॉक्टरांकडे घेऊन गेली होती. पण त्यांना त्याचे कारण सापडले नाही. त्यानंतर या महिलेने आपल्या मुलीला पुन्हा मुंबईत आणले आणि तिला शीव रुग्णालयात घेऊन गेली. जेथे डॉक्टरांना मुलीवर बलात्कार झाल्याचे समजले. डॉक्टरांनी वाकोला पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलीसांनी पीडिताच्या घरी धावू घेऊन तिची चौकशी केली. त्यावेळी तिच्या वडिलांनीच तिच्यावर बलात्कार केल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. हे देखील वाचा- पुणे: 9 वर्षीय चिमुरडीचा बापाकडून विनयभंग; POCSO Act अंतर्गत आरोपी अटकेत!

मुलीच्या आईने आरोपीविरूद्ध एफआयआर दाखल केल्यानंतर त्याला शुक्रवारी अटक करण्यात आली. त्याच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांतर्गत बलात्कार आणि पोक्सो कायद्यातील तरतुदींविंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. मुंबईच्या कोर्टाने आरोपीला 15 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे