Mumbai: मिठी मारण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाची सोनसाखळी चोरणाऱ्या महिलेला मालाड पोलिसांकडून अटक

ही घटना ऑगस्टमध्ये घडली जेव्हा 72 वर्षांचे वृद्ध खरेदी करून ऑटोने घरी जात होते.

Arrest | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Mumbai: मिठी मारण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाची एक लाख रुपये किमतीची सोनसाखळी चोरणाऱ्या महिलेला मालाड पोलिसांनी (Malad Police) मंगळवारी अटक केली. पोलिस सूत्रांनी सांगितले की, आरोपी महिलेने याच पद्धतीचा वापर करून अनेक वृद्धांना लुटले आहे. गीता पटेल असं या वृद्ध महिलेचं नाव आहे. आरोपी गीता पटेल साधारणपणे एकटे फिरायला जाणाऱ्या वृद्धांना आणि ऑटोरिक्षातून प्रवास करणाऱ्यांनाही टार्गेट करत असतं.

ऑटोरिक्षातून प्रवास करून ती चालकाला भुरळ घालायचा आणि आभार मानण्यासाठी मिठी मारायची. ती त्यांच्या मौल्यवान वस्तू जसे की फोन आणि सोन्याचे दागिने घेऊन जाण्यासाठी त्यांना मीठी मारायची, असे पोलिसांनी सांगितले. मालाड येथील एका ज्येष्ठ नागरिकाची सोनसाखळी लुटून आरोपी महिला गेल्या दोन महिन्यांपासून फरार होती. ही घटना ऑगस्टमध्ये घडली जेव्हा 72 वर्षांचे वृद्ध खरेदी करून ऑटोने घरी जात होते. (हेही वाचा - Mumbai: मुंबईतील केनेडी ब्रिजजवळ कुत्र्यासोबत फिरत असलेल्या 23 वर्षीय विद्यार्थिनीसमोर अश्लिल हावभाव केल्याप्रकरणी 32 वर्षीय व्यक्तीला अटक)

आरोपी गीता पटेल यांनी त्यांना लिफ्ट मागितली, जी वृद्धांनी मान्य केली. तिने त्याला एका इमारतीसमोर ऑटो थांबवण्यास सांगितले. या महिलेने त्या व्यक्तीला मिठी मारली आणि त्याच्या गळ्यातील सोन्याची चेन काढून घेतली. पीडिते वृद्धाला त्याच्या इमारतीत पोहोचल्यानंतरच चोरी झाल्याचे लक्षात आले.

दरम्यान, दुसऱ्या दिवशी त्यांनी मालाड पोलिसांशी संपर्क साधला. वरिष्ठ निरीक्षक रवी अधाने यांच्या देखरेखीखाली पोलिस अधिकाऱ्यांच्या पथकाने तपास सुरू करून आरोपींचा माग काढला. तपासादरम्यान, गीता पटेल ही सवयीचा गुन्हेगार असून तिने चारकोप, मालाड, बोरिवली, मीरा रोड आदी ठिकाणी असेच गुन्हे केल्याचे उघड झाले आहे. पटेलला सोमवारी मीरा भाईंदर येथून ताब्यात घेण्यात आले आणि मंगळवारी अटक करण्यात आली. आरोपी महिलेला न्यायालयात हजर केले असता तिला पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे, असं एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.