Mumbai: मुंबईतील केनेडी ब्रिजजवळ कुत्र्यासोबत फिरत असलेल्या 23 वर्षीय विद्यार्थिनीसमोर अश्लिल हावभाव केल्याप्रकरणी 32 वर्षीय व्यक्तीला अटक

एका तरुणीसमोर कपडे काढून अश्लील हावभाव केल्याच्या आरोपाखाली एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. ही घटना जूनमध्ये घडली होती. पीडितेने गमदेवी पोलिस ठाण्यात तक्रार केल्यानंतर या घटनेचा तपास सुरू झाला.

Mumbai: मुंबईतील केनेडी ब्रिजजवळ कुत्र्यासोबत फिरत असलेल्या 23 वर्षीय विद्यार्थिनीसमोर अश्लिल हावभाव केल्याप्रकरणी 32 वर्षीय व्यक्तीला अटक
Arrest | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Mumbai: दक्षिण मुंबईतील केनेडी ब्रिजजवळ 23 वर्षीय महाविद्यालयीन तरुणी आपल्या कुत्र्याला घेऊन जात होती. यावेळी तिच्यासमोर कपडे काढून अश्लील हावभाव केल्याच्या आरोपाखाली एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. ही घटना जूनमध्ये घडली होती. पीडितेने गमदेवी पोलिस ठाण्यात तक्रार केल्यानंतर या घटनेचा तपास सुरू झाला.

एका पोलिक अधिकाऱ्याने सांगितले की, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आम्ही बस स्टॉप, रेल्वे स्थानक, इतर सार्वजनिक ठिकाणी, झोपडपट्ट्या इत्यादी ठिकाणी पोस्टर लावले होते. एका माहितीच्या आधारे आम्ही 32 वर्षीय आरोपीला बुधवारी फूटपाथवरून अटक केली. तो मूळचा उत्तर प्रदेशातील भदोहीचा रहिवासी असून तो मुंबईत चित्रकार म्हणून काम करतो.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 07, 2022 08:19 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).