Maharashtra Cabinet Expansion 2024: महायुती सरकारचा खातेवाटप फॉर्म्युला 21-12-10; मंत्रिपदासाठी कोणाला फोन? घ्या जाणून

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात पार पडणाऱ्या या विस्तारासाठी 21-12-10 असे सूत्र निश्चित केल्याचे समजते. घ्या अधिक जाणून

Devendra Fadnavis, Ajit Pawar, Eknath Shinde | | (Photo credit: archived, edited, representative image)

विधानसभा निवडणूक निकाल (Maharashtra Assembly Election Results) लागून बराच काळ उलटून गेल्यानंतर जवळपास दहा दिवसांनी राज्यात भाजप (BJP), शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (AP) पक्षाचा समावेश असलेले महायुती (Mahayuti) सरकार अस्तित्वात आले. सरकार अस्तित्वात आले तरी मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra Cabinet Expansion 2024) अद्यापही झाला नाही. दरम्यान, या विस्तारास आजचा (15 डिसेंबर) मुहूर्त मिळाला आहे. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात (Maharashtra Assembly Winter Session) हा विस्तार पार पडतो आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या या सरकारमध्ये अजित पवार (Ajit Pawar) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे उपमुख्यमंत्री असणार आहेत. महायुतीतील तीन्ही पक्षांसाठी खातेवाटपाचा फॉर्म्युलाही निश्चीत झाला असून तो 21-12-10 प्रमाणात असेल असे सांगितले जात आहे. दुसऱ्या बाजूला आपापल्या पक्षनेत्यांकडून आमदारांना मंत्रीपदासाठी फोनही जायला सुरुवात झाली आहे. अद्याप कोणाच्याही नावाची अधिकृत घोषणा झाली नसली तरी, संभाव्य मंत्रिपदाच्या यादीत नाव निश्चीत समजल्या जाणाऱ्या काही आमदारांची नावे मात्र पुढे आली आहेत. ज्यामध्ये जुन्या नव्या चेहऱ्यांना संधी मिळाल्याचे पाहायला मिळते.

महायुती सरकारचा सत्तावाटपाचा फॉर्म्युला

नागपूर हिवाळी अधिवेशनात महायुती सरकारच्या आजच्या मंत्रिमंडळ विस्तारात एकूण 43 मंत्र्यांचा समावेश होईल असे चित्र आहे. या विस्तारातील सत्तावाटपाचे सूत्र खालील प्रमाणे:

भाजप: 21 मंत्रिपदे

शिवसेना (शिंदे गट): 12 मंत्रिपदे

राष्ट्रवादी काँग्रेस (AP): 10 मंत्रिपदे

मंत्रिपद निश्चित झालेले भाजपमधील संभाव्य चेहरे

जुने चेहरे: गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, प्रविण दरेकर, पंकजा मुंडे,चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील,

नवे चेहरे: शिवेंद्रसिंहराजे भोसले, नितेश राणे, जयकुमार रावल, गोपीचंद पडळकर हे चेहरे मंत्रिपसादासाठी निश्चित समजले जात आहेत. (हेही वाचा, Maharashtra Cabinet Expansion 2024 : महायुती सरकारचा आज मंत्रिमंडळ विस्तार)

शिवसेना (शिंदे गट)

जुने चेहरे: उदय सामंत, शंभूराजे देसाई, गुलाबराव पाटील, आणि दादा भुसे

नवे चेहरे: संजय शिरसाठ, भरत गोगावले, आणि योगेश कदम

दरम्यान, शिवसेना कोठ्यातून देण्यात येणाऱ्या मंत्रिपदासाठी या वेळी दीपक केसरकर, तानाजी सावंत, आणि अब्दुल सत्तार या वाचाळ मंत्र्यांना या वेळी डच्चू मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (AP)

जुने चेहरे: दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, आदिती तटकरे, धनंजय मुंडे, दत्तामामा भरणे,

नवे चेहरे: मकरंद पाटील आणि संजय बनसोडे, इंद्रनील नाईक

दरम्यान, सत्तावाटपामध्ये विविध बाबींना तिन्ही पक्षांकडून महत्त्व दिले जाणार आहे. ज्यामध्ये प्रादेशिक समतोल, सत्तेतले साचलेपण आणि कामगिरी, उपद्रवमुल्य अशा एक ना अनेक बाबी विचारात घेऊन खातेवाटप केले जाईल. त्यामुळे पक्ष वाढविण्यासाठी आणि सर्वांना सामावून घेण्याचा प्रयत्न करताना काही जुन्या चेहऱ्यांना डावलून नव्या चेहऱ्यांनाही संधी दिली जाण्यीच शक्यता आहे. दरम्यान, अद्याप कोणत्या पक्षाने मंत्रिपदासाठी निश्चित केलेल्या नावांची यादी जाहीर केली नाही. त्यामुळे केवळ संभाव्य शक्यता आणि चर्चा यांनाच उधान आले आहे.