Maharashtra Coronavirus Updates: महाराष्ट्रातील नागरिकांना मोठा दिलासा; राज्यातील कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90 टक्क्यांवर

मात्र, राज्यात करोना बाधित रुग्णवाढीच्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यात आरोग्य यंत्रणांना बऱ्यापैकी यश येऊ लागले आहे.

प्रतीकात्मक फोटो | (Photo Credits: File Image)

चीन मध्ये जन्मलेल्या कोरोना विषाणू (Coronavirus) महाराष्ट्रसह (Maharashtra) संपूर्ण देशाला हादरून सोडले आहे. मात्र, राज्यात करोना बाधित रुग्णवाढीच्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यात आरोग्य यंत्रणांना बऱ्यापैकी यश येऊ लागले आहे. राज्यात आज 4009 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. तर, 10 हजार 225 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 15 लाख 24 हजार 304 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 1 लाख 18 हजार 777 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 90.31% झाले आहे. ज्यामुळे राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

भारतात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले होते. राज्यात आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 90 लाख 65 हजार 168 चाचण्यांपैकी 16 लाख 87 हजार 784 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तर,सध्या राज्यात 25 लाख 33 हजार 870 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर, 12 हजार 195 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. हे देखील वाचा- Coronavirus In Maharashtra: महाराष्ट्रात कोरोना व्हायरसची दुसरी लाट येण्याची शक्यता कमी- आरोग्यमंत्री राजेश टोपे

राजेश टोपे यांचे ट्विट-

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रसह संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषीत करण्यात आले होते. परिणामी, अनेक उद्योगधंदे, व्यवसाय आणि वाहतूकीसह बऱ्याच गोष्ठी ठप्प झाल्या होत्या. मात्र, राज्यात मिशेन बिगेन अंतर्गत टप्प्याटप्प्याने अनेक निर्बंधांना शिथिलता देण्यात सुरुवात झाली आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif