Maharashtra ZP Election Results 2020 Highlights : पालघर, धुळे, वाशिम,अकोला, नंदुरबार, नागपूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक अंतिम निकाल, ठळक घडामोडी, घ्या जाणून

यंदा जिल्हा परिषदेमध्येही महाविकास आघाडी विरूद्ध भाजपा अशी चुरशीची लढत रंगणार आहे. या लढतीच्या निकालाचे क्षणोक्षणीचे अपडेट्स लेटेस्टली मराठी वर पहा.

09 Jan, 24:38 (IST)

पालघर जिल्हा परिषद निकाल : एकूण ५७ जागा - शिवसेना : १८, माकपा : ५, भाजप : ११,राष्ट्रवादी : १६, काँग्रेस : १, बविआ : ४, मनसे : ० अपक्ष : २

अकोला जिल्हा परिषद निकाल: एकूण ५३ जागा - शिवसेना - ११, भारिप - १९, भाजप - ५, राष्ट्रवादी - ३, काँग्रेस - ३, अपक्ष - ४

नंदुरबार जिल्हा परिषद निकाल - ५६ जागा- काँग्रेस २३, भाजपा २३, शिवसेना ७, राष्ट्रवादी ३, अपक्ष - 00

नागपूर जिल्हा परिषद निकाल -  एकूण जागा - ५८ -  काँग्रेस - ३०, राष्ट्रवादी - १०, भाजप  - १५, शेकाप - ०१, शिवसेना - ०१, अपक्ष  - ०१

वाशिम जिल्हा परिषद - भाजप - ७, शिवसेना - ७, वंचित - ९, राष्ट्रवादी - १०, काँग्रेस - ९, अपक्ष - २, जिल्हा जनविकास आघाडी - ७, स्वाभिमानी शेतकरी - १

धुळे जिल्हा परिषद निकाल - एकूण ५५ (१ निकाल राखीव)- भाजप - ३८, काँग्रेस - ४, शिवसेना - ३, राष्ट्रवादी काँग्रेस - ०, अपक्ष - १, एका जागेचा निकाल राखुन ठेवण्यात आला आहे.

पंचायत समिती निवडणूक निकाल 

अकोला पंचायत समिती निकाल - एकूण २० जागा- भारिप - १०, शिवसेना - ४, राष्ट्रवादी - १, भाजप - ३, काँग्रेस - ०, अपक्ष - २

मूर्तिजापूर पंचायत समिती निकाल -  एकूण १४ जागाछ भारिप - ६, शिवसेना - २, राष्ट्रवादी - ३, काँग्रेस - ३

धुळे - शिंदखेडा पंचायत समिती- एकूण २० जागा- भाजप - १५, शिवसेना - २, काँग्रेस - १, राष्ट्रवादी - १, अपक्ष - १

09 Jan, 24:21 (IST)

परस्पर संमतीतून अलिखीत किंवा मूक संमतीतून यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातील वणी पंचायत समिती (Wani Panchayat Samiti) सभापती, उपसभापती निवडणुकीत सीपीआय आणि भाजप यांच्यात धक्कादायक युती  घडल्याचे समजते. आश्चर्यकारक ठरलेल्या या सांकेतीक युतीत भाजपचे संजय पिंपळशेंडे सभापती तर, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे चंद्रज्योती शेंडे यांची उपसभापती म्हणून निवड झाल्याचे समजते आहे.

09 Jan, 24:13 (IST)

उस्मानाबाद जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना आमदार तानाजी सावंत यांनी केलेले बंड आज दिवसभर चर्चेत राहिले आहे. त्यामुळे स्वपक्षालाच अडचणीत आणणाऱ्या आमदार सावंत यांच्यावर पक्ष काय कारवाई करणार याबबत शिवसैनिकांमध्ये  उत्सुकता आहे.

08 Jan, 23:12 (IST)

धुळे जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने दमदार विजय मिळवला आहे. इथे महाविकासआघाडी आणि अनिल गोटे यांच्या गटाचाही दारुन पराभव झाला आहे. या पराभवानंतर अनिल गोटे यांनी भाजपवर खळबळजनक आरोप करत भाजपने हा विजय अधिकाऱ्यांना पैसे चारुन मिळवला असल्याचे म्हटले आहे.

08 Jan, 22:23 (IST)

अकोला जिल्हा परिषदेतील 52 जागांपैकी कोणातच पक्ष मॅजिक फिगर न गाठू शकल्याने स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. मात्र राष्ट्रवादी 12, काँग्रेस 9, शिवसेना 6 व अन्य पक्ष जसे जनविकास आघाडी, वंचित बहुजन आघाडी आणि अपक्ष एकत्र येऊन 18 जागा सरकार स्थापण्याची शक्यता अधिक आहे. भाजपला मात्र वाशिम मध्ये केवळ 7 जागी विजय मिळवता आला आहे.

 

08 Jan, 22:06 (IST)

अकोला जिल्हा परिषदेतील 53 जागांपैकी 21 जागी विजयी मिळवत वंचित बहुजन आघाडीने विजयाकडे वाटचाल सुरु केलेली आहे. 

08 Jan, 21:39 (IST)

नागपूर जिल्हा परिषद निकालात भाजपची होम ग्राउंडवर झालेली पीछेहाट पाहता कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारला जनतेची पसंती मिळत आहे असे विधान केले आहे.  नागपूर मध्ये सध्या काँग्रेसकडे 31 राष्ट्रवादी काँग्रेस कडे 10 तर शिवसेनेकडे 1 जागीचा विजय आहे. भाजपला मात्र 14 जागांवर विजय मिळवून समाधान मानावे लागले आहे. अजून 53 पैकी 16 जागांचे निकाल येणे बाकी आहे. 

08 Jan, 20:46 (IST)

नंदुरबार जिल्हा परिषदेच्या 56 जागांचा निकाल हाती आला असून कोणत्याही पक्षाला बहुमत प्राप्त झालेले नाही. भाजप आणि काँग्रेस पक्षाला प्रत्येकी 23 जागांवर विजय प्राप्त झाला आहे तर शिवसेना 7 आणि राष्ट्रवादी 3 जागी जिंकलेली आहे. महाविकास आघाडीला याठिकाणी बहुमत असले तरी सत्तास्थापनेसाठी एकत्र येण्याबाबत तिन्ही पक्षांनी स्पष्टीकरण दिलेले नाही. 

08 Jan, 20:26 (IST)

पालघर जिल्हा परिषदेमध्ये 57 जागा आहेत. त्यापैकी सर्वाधिक 18 जागा शिवसेना पक्षाने जिंकल्या आहेत.  

08 Jan, 20:03 (IST)

नागपूरमध्ये भाजप दिग्गजांच्या मतदारसंघात पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. या निकालानंतर एनसीपी नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया देताना हा निकाल म्हणजे आता 'हवा बदल रही है' असं म्हणत भाजपची खिल्ली उडवली आहे. 58 जागांपैकी भाजपाला 09 तर महाविकासआघाडीला 25 जागा मिळाल्या आहेत. Nagpur ZP Election Results 2020: नागपूर जिल्हा परिषदेमध्ये नितीन गडकरी,चंद्रशेखर बावनकुळे या भाजपा दिग्गजांना धक्का; काँग्रेस उमेदवार विजयी

 

 
08 Jan, 19:25 (IST)

वाशिम जिल्हा परिषद निकालात चारही मुख्य पक्षांना मागे टाकत वंचित बहुजन आणि  जनविकास आघाडीने बाजी मारल्याचे दिसत आहे. 52 पैकी 33 जागांचे निकाल हाती आले असून यात वंचितला 6, जनविकास आघाडीला 6 आणि  अपक्षांना 2  विजय प्राप्त झाले आहेत, तर, मुख्य पक्षांमध्ये भाजप अद्याप 7 जागी, काँग्रेस 3 शिवसेना आणि राष्ट्रवादी 4 जागी विजयी झाली आहे. 

 

08 Jan, 19:15 (IST)

धुळे  जिल्हा परिषद  निवडणुक निकालात भाजपने 31 जागी मोठा विजय मिळवत बहुमताचा आकडा पार केला आहे. 56 पैकी 43 जागांचे निकाल जाहीर झाले आहेत ज्यात 31 जागी भाजपच्या उमेदवारांना यश प्राप्त झाले आहे. 

 

08 Jan, 19:11 (IST)

धुळे  जिल्हा परिषद  निवडणुक निकालात भाजप बहुमत मिळवून सहज बाजी मारू शकेल असे आकडे समोर आले आहेत.  आतापर्यंत निकाल घोषित झालेल्या 35 जागांमध्ये भाजपला 28 जागी विजय प्राप्त झाला असून , महाविकास आघाडीची गाडी 6 जागी अडकून पडली आहे. अजून  21 जागांचे निकाल येणे बाकी आहे. 

08 Jan, 18:58 (IST)

पालघर जिल्ह्यातील 57 जागांपैकी 8  जागांवर विजय मिळवत राष्ट्रवादी कॉंग्रेसने आघाडी घेतली आहे, मात्र NCP ला तोडीसतोड अशा 7 जागी विजय मिळवत माकप देखील शर्यतीत कायम आहे. याठिकाणी भाजपला 4 आणि शिवसेनेला 1 जागी विजय मिळाला आहे. 

 

08 Jan, 18:41 (IST)

अकोला जिल्हा परिषद निकालात 53 पैकी 22 जागांचे निकाल हाती आले आहेत, यामध्ये तूर्तास भारिप बहुजन महासंघ आणि भारतीय जनता पक्षात काटे की टक्कर पाहायला मिळत आहे. सध्या भारिप उमेदवार 9 जागी तर भाजप उमेदवार 5 जागी विजयी झाले आहेत तर पाठोपाठ शिवसेनेच्या   4 , काँग्रेसच्या 2 राष्ट्रवादीच्या  2 आणि 1 अपक्ष उमेदवाराचा विजय झाला आहे. (Nagpur ZP Election Results 2020: नागपूर जिल्हा परिषदेमध्ये नितीन गडकरी,चंद्रशेखर बावनकुळे यांना धक्का; काँग्रेस उमेदवार विजयी)

08 Jan, 18:23 (IST)

आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांच्या पत्नी हेमलता पाडवी यांचा नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ जिल्हा परिषद गटातून पराभव झाला आहे. 

08 Jan, 18:10 (IST)

नंदुरबार जिल्हयातील 56 जिल्हापरिषद गटांसाठी घेतलेल्या निवडणुकीत सध्या समोर आलेले निकाल हे काँग्रेसच्या बाजूने झुकलेले दिसत आहेत. 56 पैकी आतापर्यंत एकूण 10 जागी काँग्रेसने विजयी पताका रोवली असून त्यापाठोपाठ भाकप 6 तर शिवसेना 4 जागी विजयी झाली आहे. राष्ट्रवादीला मटार अद्याप नंदुरबारमध्ये खातं उघडता आलेलं नाही. 

08 Jan, 18:04 (IST)

नागपूर जिल्हयातील मेंटपाजरा जिल्हापरिषद गटातुन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख विजयी झाले आहेत.

 

08 Jan, 17:55 (IST)

नागपूरच्या वेलतूर जिल्हापरिषद गटात भाजप ने आपलं खात उघडले आहे, नागपूर मधला हा भाजपच्या गटातील पहिला विजय कविता साखरवाडे यांच्या रूपात समोर आला आहे.  

08 Jan, 17:50 (IST)

नागपूर जिल्हयातील मेंटपाजरा जिल्हापरिषद गटातुन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख विजयाच्या उंबरठयावर आहेत. मताधिक्य टिकवून ठेवल्यास सलील यांचा विजय जवळपास निश्चित आहे.  

 

Read more


Maharashtra ZP Election Results 2020 Live: महाराष्ट्रात नागपूर (Nagpur), पालघर (Palghar), धुळे (Dhule) , वाशिम (Washim) सह 6 जिल्हा परिषद निवडणुकांच्या (ZP Elections) मतमोजणीला आज सकाळी 10 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे, यातील काही ठिकाणची निकाल आता हळूहळू हाती येऊ लागले आहेत. या निवडणूकांमध्ये नागपूर मध्ये विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) , उत्तर महाराष्ट्रात गिरिश महाजन (Girish Mahajan) यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पालघर, नागपूर, धुळे, नंदुरबार, अकोला आणि वाशिम या सहा जिल्हा परिषदांसाठी काल मतदान पार पडले होते. विधानसभेप्रमाणेच आता जिल्हा परिषदेमध्ये शिवसेना (Shivsena) , कॉंग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस ही महाविकास आघाडी एकत्र लढली आहे.

ZP Election Results 2020: नागपूर, पालघर, धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम जिल्हा परिषद निवडणूक मतमोजणीला सुरूवात

प्राप्त माहितीनुसार, पालघर जिल्हा परिषदेच्या 57 जागांसाठी 229 उमेदवार आहेत. नागपूर जिल्हा परिषदेच्या 58 गटांसाठी 270 उमेदवार रिंगणात आहेत. सोबत 13 पंचायत समित्यांच्या 116 गणांसाठी मतदान पार पडले. नंदुरबार जिल्हा परिषदेच्या 56 गटांसाठी 225 उमेदवार तर पंचायत समितीच्या 112 जागांसाठी 359 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. वाशिम जिल्हा परिषदेच्या 52 जागा, तर सहा पंचायत समितीच्या 104 जागांवरील निकाल आज जाहीर केले जाणार आहेत. धुळे जिल्हा परिषदेमध्ये 51 गटांसाठी 216 उमेदवार, तर 110 गणांसाठी 397 उमेदवार रिंगणात आहेत.

यंदा जिल्हा परिषदेमध्येही महाविकास आघाडी विरूद्ध भाजपा अशी चुरशीची लढत रंगणार आहे. या लढतीच्या निकालाचे क्षणोक्षणीचे अपडेट्स लेटेस्टली मराठी वर पहा..

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now