Maharashtra Weather Updates: महाराष्ट्रात पुढील 2 दिवस ढगाळ वातावरण राहणार

दरम्यान राज्यात थंडी असली तरीही विदर्भामध्ये पुढील 2-3 दिवस पावसाचं वातावरण राहणार आहे.

Winter | Photo Credits Twitter

उत्तर भारताप्रमाणेच आता मुंबई, पुणे, विदर्भसह महाराष्ट्रातही थंडीचा गारवा जाणवायला सुरूवात झाली आहे. यंदा विदर्भात अवकाळी पाऊस बरसत असल्याने डिसेंबर महिना उलटला तरीही दरवर्षीप्रमाणे थंडी जाणवत नव्हती. मात्र यंदा हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आता पुढील 2 दिवस गुलाबी थंडीचं वातावरण राहणार आहे. दरम्यान राज्यात थंडी असली तरीही विदर्भामध्ये पुढील 2-3 दिवस पावसाचं वातावरण राहणार आहे.

मागील आठवड्यामध्ये विदर्भात थंडीची लाट पसरली होती. त्यानंतर गारपीट देखील झाली होती. याचा परिणाम विदर्भाच्या वातावरणात झाला होता. त्यानंतर वातावरण कोरडे झाले आहे. किमान तापमानामध्येही घट झालेली आहे. महाराष्ट्रात 7 आणि 8 जानेवारी दिवशी ढगाळ वातावरण राहणार आहे. किमान तापमानात काहीशी वाढ होऊ शकेल. असे म्हटले जात आहे. फ्लेमिंगो पक्षांचे मुंबईत आगमन: BMC ने शेअर केला फोटो; नयनसुख घेण्यासाठी 'महाराष्ट्र निसर्ग उद्याना'ला भेट द्या.   

 

रविवार (5 जानेवारी) दिवशी महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी तापमान अकोला येथे नोंदवण्यात आले आहे. अकोल्यामध्ये काल तापमान 10.2 अंश सेल्सिअल इतके नोंदवण्यात आले आहे. तर मुंबईचं तापमान 19 अंश सेल्सिअस होते. रत्नागिरीमध्ये तापमान 2.1 अंशांनी कमी झालं आहे. महाबळेश्वर आणि जळगावमध्ये किमान तापमान सरासरीखाली आली आहे.

विदर्भात सर्वच ठिकाणी किमान तापमानात मोठय़ा प्रमाणावर घट झाली आहे. 10 ते 12 अंशांवर किमान तापमान असल्याने या भागात थंडी कायम आहे.