Maharashtra Weather Forecast: 12 जूनपासून देशभरात मान्सून पुन्हा सक्रीय होणार; पहा उद्याचा हवामान अंदाज

हवामान विभागाचे हवामान शास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूर, सांगली, सातारा या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

Maharashtra Weather Forecast: 12 जूनपासून देशभरात मान्सून पुन्हा सक्रीय होणार; पहा उद्याचा हवामान अंदाज
Udyache Havaman | File Image

यंदा मे महिन्यामध्ये विक्रमी पाऊस बरसल्यानंतर मागील काही दिवस राज्यात त्याने दडी मारली आहे. मात्र हवामान खात्याच्या अंदाजानुसार आता 12 जून पाऊस तो पुन्हा सक्रिय होणार आहे. कोकण-गोवा मध्ये काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडणार आहे. काही जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे काही जिल्ह्यांसह घाट परिसरामध्ये पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मग जाणून घ्या सध्या महाराष्ट्रामध्ये काय उद्याचा हवामान अंदाज ?

हवामान विभागाचे हवामान शास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूर, सांगली, सातारा या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर 14 जूननंतर राज्यात सर्वत्र पाऊस पडण्याची शक्यता आहे.  नक्की वाचा: Monsoon Forecast 2025: जून महिन्यात 108% पाऊस, खरीप पिके आणि कृषी क्षेत्रास दिलासा; हवामान अंदाज वर्तवताना IMD चे भाकीत .

महाराष्ट्रात हवामान विभागाचा अंदाज

मुंबई मधील हवामानाचा अंदाज

Windy: Wind map & weather forecast

 

महाराष्ट्रात अद्याप पूर्णपणे मान्सून दाखल झालेला नाही. उत्तर मध्य महाराष्ट्र किंवा विदर्भातील काही भागात अद्याप पावसाचे आगमन झालेले नाही. विदर्भातील गडचिरोलीच्या काही भागात दाखल झालेला मान्सून रखडला असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे उकाडा पुन्हा वाढला आहे. बंगालच्या खाडीतून किंवा अरबी समुद्रातून पावसाला पूरक वातावरण निर्माण होत नसल्याने उत्तरेकडून गरम वारे येत असल्याने तापमानात वाढ झाल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jun 11, 2025 04:48 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).