IPL Auction 2025 Live

Maharashtra Weather Forecast: महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी; विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला 'यलो अलर्ट'!

अधून मधून कोसळणार्‍या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.

Rains | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्रामध्ये मागील काही दिवसांपासून कोसळणारा पाऊस आता थोडा शांत झाला आहे. नाशिक (Nashik) मध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला होता त्यामुळे बीड, बुलढाणा,औरंगाबाद मध्ये जोरदार पाऊस झाला आहे. मुंबई, ठाण्यातही पावसाच्या अधून मधून जोरदार सरी बरसत होत्या. मात्र आज हवामान खात्याने दिलेल्या इशार्‍यानुसार, मराठवाडा सह विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचा यलो अलर्ट आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क रहावे असा इशारा देण्यात आला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी काही ठिकाणी पाऊस कोसळत आहे. मुंबई, ठाणे परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या अंदाज आहे. अधून मधून कोसळणार्‍या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. हे देखील नक्की वाचा: SW Monsoon Withdrawal 2022: मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला पोषक वातावरण; पहा हवामान अंदाज .

बीड, मराठवाडा भागामध्ये जोरदार पाऊस झाल्याने पीकांचं मोठं नुकसान झालं आहे. नदी, नाले दुथडी भरून वाहत असल्याने शेतामध्ये पाणी घुसून पीक, धनधान्यांचं मोठं नुकसान झालं आहे.

महाराष्ट्रामध्ये ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून मान्सूनचा परतीचा पाऊस सुरू होऊ शकतो असा अंदाज आहे. उत्तर भारताच्या काही भागांतून नैऋत्य मान्सून परतीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत असल्याची माहिती हवामान खात्याकडून काही दिवसांपूर्वी देण्यात आली आहे.