IPL Auction 2025 Live

शिवसेना- भाजपा 50- 50 फॉर्म्युलावर ठाम; महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालांनंतर उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया

यासोबतच येत्या काळात सत्तास्थापनच्या दृष्टीने सेनेचा पवित्रा देखील स्पष्ट केला.

Shiv Sena Party Chief Uddhav Thackeray | (Photo Credits: Facebook, File Photo)

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Elections 2019)  निकालाच्या नंतर शिवसेनेचे (Shivsena) अध्यक्ष उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey) यांनी नुकतीच एकी पत्रकार परिषद घेऊन निकालाचे थोडक्यात विश्लेषण केले. यासोबतच येत्या काळात सत्तास्थापनच्या दृष्टीने सेनेचा पवित्रा देखील स्पष्ट केला. उद्धव यांनी सांगितल्यानुसार, लोकसभा निवडणुकीच्या वेळी महायुतीला सत्तेत येताच समसमान वाटा देण्याचा फॉर्म्युला ठरला होता. त्याची अंमलबजावणी यंदा सुद्धा करण्यात येईल आणि त्यानंतरच सत्ता स्थापनेचा दावा करण्यात येईल. मला सत्तेची हाव नाही, त्यामुळे सत्तेसाठी वेडेवाकडे पर्याय स्वीकारणे माझ्या रक्तात नाही असे म्हणत काँग्रेस-राष्ट्रवादीची (Congress-NCP) सत्तेची ऑफरही धुडकावून लावली, मात्र मलाही माझा पक्ष सांभाळायचा आहे त्यामुळे सत्ता वाटपात तडजोड होणार नाही, असा सूचक इशारा सुद्धा उद्धव यांनी दिला आहे.

सत्तावाटपात जरी 50-50असा फॉर्म्युला असला तरी निवडणुकीत मात्र शिवसेनेने छोट्या भावाची भूमिका स्वीकारली होती यामागील कारण सांगताना, उद्धव यांनी विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्षाने 144 -144 जागा लढण्याचे ठरवले होते मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे आमची अडचण समजून घेतील, अशी विनंती केल्याने आम्ही त्यांची अडचण समजून घेत 124 जागांवर लढण्याचा निर्णय घेतला अशी माहिती दिली.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2019 Live Updates: घाटकोपर पूर्व मधून राम कदम विजयी

दरम्यान, मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा महायुतीला संयुक्तरित्या कमी मते मिळाली आहेत, यावरून जनादेशाने डोळ्यात अंजन घालायचे काम केले आहे असे उद्धव यांनी सांगितले आहे तर कोणत्याही दडपणाला बळी न पडता लोक जनतेला गृहित धरून चालणाऱ्यांचे पाय जमिनीवर ठेवणारा हा निर्णय देण्यासाठी जनतेचे आभार मानले आहेत.आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांचा विजय झाला आहे यावर सुद्धा प्रतिक्रिया देत उद्धव यांनी आम्हाला पालक म्ह्णून आदित्यचा अभिमान वाटतो अशा शब्दात मुलाचे कौतुक केले आहे.