महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2019 Live Updates: महाराष्ट्रात राजकीय स्थैर्य स्थापन केल्याने देवेंद्र फडणवीस यांचा पुन्हा विजय; नरेंद्र मोदी यांनी दिली कौतुकाची थाप

21 ऑक्टोबर रोजी मतदान पार पडले. मतदान पार पडताच मतमोजणी करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. मतमोजणीसाठी तब्बल 10 हजार पेक्षाही अधिक आधिकारी आणि कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. मतमोजणीसाठी सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण देण्यात आले आहे. या मतमोजणीचे लाइव्ह अपडेट घेण्यासाठी सज्ज राहा लेटेस्टली मराठीसाठी

25 Oct, 01:30 (IST)

महाराष्ट्र सारख्या मोठ्या राज्यात राजकीय दृष्टीने मागील पाच वर्षात स्थैर्य स्थापन करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर जनतेने विश्वास टाकून पुन्हा निवडून दिले आहे. यासाठी पंतप्रधान नरेंडनर मोदी यांनी फडणवीस यांची कौतुक करून नागरिकांचे आभार मानले आहेत. आज निवडणूक निकालाच्या नंतर दिल्ली येथील भाजपा कार्यालयातून ते बोलत होते. 

24 Oct, 23:55 (IST)

आदित्य ठाकरे यांनी आज विजयानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी आदित्य ठाकरे यांनी मताधिक्य  स्वीकारलं आहे. 

24 Oct, 23:32 (IST)

चांदिवली मतदार संघातून नसीम खान यांचा 409 मतांनी पराभव झाला आहे. दिलीप लांडे यांनी त्यांचा पराभव केला आहे.  

24 Oct, 23:26 (IST)

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले आहेत. तर देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत यांचे आभार मानले आहेत.

24 Oct, 23:26 (IST)

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले आहेत. तर देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत यांचे आभार मानले आहेत.

24 Oct, 23:13 (IST)

भाजपाचा बालेकिल्ला समजला  जाणार्‍या घाटकोपर पूर्व आणि पश्चिम मतदारसंघात भाजपाचे उमेदवार निवडून आले आहेत. पराग शहा आणि राम कदम विजयी ठरले आहेत. इथे वाचा निकालाचे अपडेट्स .   

24 Oct, 22:25 (IST)

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अनेक  दिग्गज नेत्यांनी भाजपा- शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला. त्यामुळे बंडखोरी देखील झाली. मुख्यमंत्र्यांनी या बंडखोरीमुळे नुकसान झाल्याची कबुली दिली आहे. तसेच जे जिंकून आले आहेत त्यांची  मनधरणी करून महायुतीमध्ये सहभागी करून घेतलं  जाईल असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. 

24 Oct, 22:16 (IST)

भाजपा कार्यालयात देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद आयोजित केली आहे. या वेळेस त्यांनी मतदारांचे आभार मानले आहेत.  

24 Oct, 22:09 (IST)

उद्धव ठाकरे यांनी मीडियाशी बोलताना आज सत्ता स्थापनेची घाई नसल्याचं म्हटलं आहे. फॉर्म्युल्यावर निर्णय घेतल्यानंतर सत्तास्थापनेचा दावा केला जाईल असं म्हटलं आहे. 

24 Oct, 22:04 (IST)

उद्धव ठाकरे यांनी जनतेने दिलेला निकाल स्वीकारणार आसल्याचं म्हटलं आहे. आता  सत्ता स्थापानेसाठी भाजपासोबत बोलणी करणार, 50-50 चा फॉर्म्युला पुन्हा भाजपाच्या लक्षात आणून देणार. 

24 Oct, 21:59 (IST)

भाजपा नेते  चंद्रकांत पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, किरीट सोमय्या, भाजपा कार्यालयात पोहचले आहेत.  तर मातोश्रीवर उद्धव ठाकरे मीडियाशी बोलत आहेत.  

24 Oct, 21:20 (IST)

राजू पाटील कल्याण ग्रामीण मतदारसंघातून विजयी; मनसेचे खाते उघडले.  शिवसेनेच्या रमेश म्हात्रे यांचा केला पराभव. 

24 Oct, 21:20 (IST)

राजू पाटील कल्याण ग्रामीण मतदारसंघातून विजयी; मनसेचे खाते उघडले.  शिवसेनेच्या रमेश म्हात्रे यांचा केला पराभव. 

24 Oct, 21:00 (IST)

ठाकरे कुटुंबातून निवडणूकीच्या रिंगणात उतरलेल्या आदित्य ठाकरे यांचा विजय झाला आहे. वरळीत सुरेश माने वर  मात करून आदित्य ठाकरेंनी विजय मिळवला आहे. 67 हजारांहून अधिक मतांनी विजय मिळवला आहे. 

24 Oct, 20:52 (IST)

भाजपा 4 वाजता पत्रकार परिषद घेणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील या पत्रकार परिषदेमध्ये सहभागी होणार आहेत.  विधानसभा निवडणूक निकालाबद्दल भाजपाची प्रतिक्रिया यावेळेस स्पष्ट होणार आहे.  

24 Oct, 20:44 (IST)

एकनाथ खडसे यांना नाकारून त्यांची लेक रोहिणी खडसे यांना भाजपाने तिकीट दिले. मात्र मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून पराभूत झाल्या आहेत. तर इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील पराभूत झाले आहेत. 

24 Oct, 20:37 (IST)

शाहूवाडीमध्ये जनसुराज्य पक्षाचे  विनय कोरे विजयी; शिवसेना उमेदवार सत्यजित पाटील यांना पराभूत केले आहे. 

24 Oct, 20:22 (IST)

सोलापूर मध्य मध्ये कॉंग्रेसच्या प्रणिती शिंदे विजयी ठरल्या आहेत. प्रणिती या माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आहेत. सुरूवातीला त्या पिछाडीवर असल्याच्या बातम्या आल्या होत्या. अटीतटीच्या लढाईत अखेर प्रणिती पुन्हा आमदार झाल्या आहेत.  

 

24 Oct, 20:16 (IST)

कोकणात सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात  दीपक केसरकर विजयी ठरले आहेत. राजन तेली  यांचा पराभव केला आहे. इथे पहा सारे निकालाचे सारे अपडेट्स .  

24 Oct, 20:16 (IST)

कोकणात सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात  दीपक केसरकर विजयी ठरले आहेत. राजन तेली  यांचा पराभव केला आहे. इथे पहा सारे निकालाचे सारे अपडेट्स .  

Read more


Maharashtra Vidhan Sabha Election Results 2019 Live News Update: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 (Maharashtra Assembly Elections 2019) साठी झालेल्या मतदानाची मतमोजणी आणि अंतिम निकाल आज जाहीर होत आहे. सकाळी आठ वाजलेपासून मतमोजणीस सुरुवात होईल. राज्यातील तब्बल 288 विधानसभा मतदारसंघ आणि साताार लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान पार पडले. मतदान पार पडताच मतमोजणी करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. मतमोजणीसाठी तब्बल 10 हजार पेक्षाही अधिक आधिकारी आणि कर्मचारी नियुक्त करण्यात आल्याची माहिती माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली आहे. शिंदे यांनी सांगितले की, मतमोजणीसाठी सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण देण्यात आले आहे. या मतमोजणीचे लाइव्ह अपडेट घेण्यासाठी सज्ज राहा लेटेस्टली मराठीसाठी.  सातारा: विधानसभा, लोकसभा निवडणूक निकाल जाहीर होणार तब्बल 12 तास उशीराने; कारण घ्या जाणून.

अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील सर्व मतदारसंघातील मतमोजणी एकूण 269 ठिकाणी पार पडेल. त्यासाठी मतदारसंघातील मतदान केंद्रांच्या सख्याप्रमाणानुसार 14 ते 20 टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक टेबलसाठी प्रत्येकी एक पर्यवेक्षक(सुपरवायझर) आणि दोन सहाय्यक, तीन मतमोजणी अधिकारी असतील. मतमोजणीची सुरुवात 5 बुथवरील व्हीव्हीपॅट चिठ्ठ्यांपासून होईल. हे बूथ चिठ्ठी टाकून निवडले जातील. स्ट्राँगरुम ते मतदान केंद्र इथपर्यंतचा ईव्हीएमाच्या प्रवासाचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येईल.

दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी एकूण 288 जागांपैकी शिवसेना ही 124 तर भाजप हा 164 जागांवर लढतो आहे. उर्वरीत जागांव युतीचे मित्रपक्ष लढत आहेत. तर, दुसऱ्या बाजूला काँग्रेस-राष्ट्रवादी हे पक्ष आघाडी करुन लढत आहेत. काँग्रेस 147 तर, राष्ट्रवादी 124 जागा लढवत आहे. उर्वरीत जागा दोन्ही पक्षांनी समाजवादी पक्ष, आरपीआय, स्वाभिमानी शेतकरी संघटना, जनता दल, शेतकरी कामगार पक्ष अशा मित्रपक्षांना सोडल्या आहेत. मतमोजणीच्या पार्श्वभूमिवर राज्यातील राजकीय वर्तुळ आणि सर्वच नेत्यांसह कार्यकर्ता आणि जनतेमध्ये उत्सुकतेचे वातावरण आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now