Maharashtra Vidhan Sabha Election: मुंबई मध्ये काळबादेवी भागामध्ये मुंबई पोलिसांनी सुमारे 2 कोटींची रोकड केली जप्त; 12 जण ताब्यात
अधिकार्यांना ते या पैशांबाबत कोणतीही माहिती सांगू शकले नाहीत. तसेच या पैशांशी निगडीत कागदपत्रांची देखील पूर्तता करू शकलेले नाहीत.
महाराष्ट्रामध्ये 20 नोव्हेंबर दिवशी विधानसभा निवडणूक (Maharashtra Vidhan Sabha Election) होणार आहे. सध्या त्या निवडणूकांच्या अनुषंगाने राज्यात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या निवडणूकीच्या धामधूमीमध्ये पोलिसांनी दक्षिण मुंबई मध्ये काळबादेवी (Kalbadevi) भागात 2.3 कोटी रूपयांची रोकड जप्त केली आहे. यासोबत 12 जणांना देखील मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) ताब्यात घेतले आहे.
मुंबई पोलिसांना मिळालेल्या टीप वरून लोकमान्य टिळक मार्ग पोलिस स्टेशन च्या टीमकडून ही कारवाई करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या अधिकार्यांसोबत गुरूवारी कारवाई केली आहे. पोलिसांना या कारवाई मधेय 2.3 कोटीची रोकड सापडली आहे. अधिकार्यांना ते या पैशांबाबत कोणतीही माहिती सांगू शकले नाहीत. तसेच या पैशांशी निगडीत कागदपत्रांची देखील पूर्तता करू शकलेले नाहीत. Gold Seized In Pune: पुण्यात नाकाबंदी दरम्यान टेम्पोत सापडलं 138 कोटी रुपये किमतीचे सोने.
राज्य निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू असल्याने, निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार तयार करण्यात आलेली पाळत ठेवणारी पथके रोख, दारू आणि इतर वस्तूंसारख्या संभाव्य प्रलोभनांच्या हालचाली तपासत आहेत.