खुशखबर! शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिद्ध; पहा कोणत्या वर्गासाठी किती जागा राखीव
प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक भरतीची जाहीरात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत या वेबपोर्टलवर प्रदर्शित करण्यात आली.
राज्यात गेली सहा वर्षे शिक्षक भरती (Teacher Recruitment) झाली नाही, गेले अनेक महिने शिक्षकांचे यासाठी आंदोलन चालू आहे. काही आठवड्यांपूर्वी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी शिक्षक भरतीची घोषणा केली होती मात्र त्यावर ठोस पावले उचलली गेली नव्हती. आता राज्यसरकारने पवित्र पोर्टल (Pavitra Portal) च्या माध्यमातून संपूर्ण राज्यात 10 हजार 1 शिक्षकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक भरतीची जाहीरात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत या वेबपोर्टलवर प्रदर्शित करण्यात आली.
पवित्र पोर्टलच्या माध्यमातून यावर्षी संपूर्ण भ्रष्टाचारविरहीत शिक्षक भरती होणार आहे. यासाठी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण माहिती व्यवस्थित वाचावी असा सल्ला देण्यात आला आहे.
अशी असेल भरती –
अनुसूचित जाती- 1704
अनुसूचित जमाती- 2147
अनुसूचित जमाती (पेसा)- 525
व्हि.जे.ए.- 407
एन.टि.बी.- 240
एन.टी.सी- 240
एन.टी.डी.- 199
इमाव- 1712
इ.डब्ल्यू.एस- 540
एस.बी.सी.- 209
एस.ई.बी.सी.- 1154
सर्व साधारण- 924
(हेही वाचा: मेगाभरतीनंतर राज्यात ‘शिक्षक भरती’ची घोषणा; पाहा कोणत्या इयत्तांसाठी किती आहेत रिक्त जागा
सुमारे 5000 च्या वर शिक्षक अतिरिक्त झाल्यामुळे समायोजनात रिक्त जागा कमी झाल्या. 6 जिल्ह्यातील बिंदू नामावलीनंतर शून्य जागा खुल्या, एसईबीसी आणि ईबीसी वर्गासाठी दिसल्यामुळे त्या सहा जिल्ह्यांच्या बिंदूनामावलीची फेरतपासणी केल्यानंतर या जागा त्वरीत भरल्या जातील, तोपर्यंत 50 टक्के तिथल्या जागा भरल्या जातील. 2 मार्च 2019 रोजी शिक्षक भरतीची जाहिरात वृत्तपत्रात प्रसिध्द होणार आहे, आणि त्याच वेळी पवित्र पोर्टलवर सदर जाहिरात उमेदवारांना पहावयास मिळणार आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)