महाराष्ट्र: औरंगाबाद मधील सिव्हिल रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी कोरोनाबाधित आई, नवजात बाळाची व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून घडवली भेट
तसेच नवजात मुलगी आणि आई यांना वेगळ्या वॉर्ड्स मध्ये ठेवण्यात आले आहे.
देशभरास महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातल्याने त्याच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे सरकारकडून कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचसोबत रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्स आणि वैद्यकिय कर्मचारी कोरोनाबाधित रुग्णांवर दिवसरात्र काम करत आहेत. याच पार्श्वभुमीवर कोरोनाबाधित आई आणि नवजात बालकासोबत औरंगाबाद मधील सिव्हिल रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून संवाद साधत त्यांची भेट घडवून आणली आहे. तसेच नवजात मुलगी आणि आई यांना वेगळ्या वॉर्ड्स मध्ये ठेवण्यात आले आहे.
सिव्हिल सर्जनचे डॉक्टर सुंदर कुलकर्णी यांनी असे सांगितले आहे की, 18 एप्रिल रोजी नवजात मुलीचा सिझेरियन सेक्शन मध्ये जन्म झाला आणि चाचणी निगेटीव्ह आली. डॉक्टर्स, नर्स आणि वैद्यकिय कर्मचारी कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करत असून त्यासंदर्भात खबरदारी सुद्धा घेत आहेत. तर राज्यात कोरोनाच्या विरोधातील लढ्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत.(Coronavirus: पुण्यातील 92 वर्षीय आजींची कोरोनावर मात, परिवारातील अन्य 4 जणांची चाचणी निगेटिव्ह आल्याने डिस्चार्ज)
Coronavirus :'गो कोरोना,कोरोना गो' म्हणणाऱ्या रामदास आठवले यांच्या पोलिस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण - Watch Video
दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 5 हजारांच्या पार गेला आहे. त्यामुळे सद्यची स्थिती गंभीर असून नागरिकांनी लॉकडाउनच्या नियमाचे पालन करणे अत्यावश्यक आहे. तरीही नागरिकांकडून सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचा फज्जा उडाल्याचे काही ठिकाणी दिसून आले आहे. तसेच पोलिसांकडून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यात येत आहे.