Maharashtra SSC Exam 2020 Time Table: यंदा 10 वीची परीक्षा 3-23 मार्च; PDF स्वरूपात पहा आणि डाऊनलोड करा दहावीच्या परीक्षेचं संपूर्ण वेळापत्रक, mahahsscboard.maharashtra.gov.in वर अधिक माहिती
3-23 मार्च 2020 पर्यंत चालणार्या दहावीच्या परीक्षांसाठी राज्यात एकूण 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे.
MSBSHSE SSC Exam 2020 Time Table: महाराष्ट्रामध्ये 12वी पाठोपाठ 10वीच्या परीक्षा यंदा 3 मार्चपासून सुरूवात होणार आहे. 3-23 मार्च 2020 पर्यंत चालणार्या दहावीच्या परीक्षांसाठी राज्यात एकूण 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. यापैकी 9,75,894 विद्यार्थी तर 7,89,898 विद्यार्थीनी आहेत. तर यंदा महाराष्ट्र राज्यामध्ये एसएससी परीक्षेसाठी 4979 परीक्षा केंद्र सज्ज ठेवण्यात आली आहेत. दरम्यान परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी आणि विषयांनुसार अभ्यासाचं प्लॅनिंग करण्यासाठी यंदाच्या एसएससी बोर्डाचं टाईमटेबल तुमच्या जवळ ठेवा तसेच PDF स्वरूपातील वेळापत्रक डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
यंदा इयत्ता दहावीच्या परीक्षेच्या गुणपत्रिका, परीक्षा पद्धतीमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. हे नवीन बदल लक्षात घेऊन त्यानुसारच विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी करण्याचे आवाहन मंडळाकडून करण्यात आले होते. इयत्ता 10 वीच्या विषय योजना व सुधारित मूल्यमापन योजना तयार करण्यात आल्या आहेत. सध्या सुरु असणाऱ्या शैक्षणिक वर्ष 2019-20पासून दहावीच्या भाषा आणि सामाजिक शास्त्रे या विषयांकरिता लेखी परीक्षा 80 गुणांची असणार आहे तर व अंतर्गत मूल्यमापन 20 गुणांचे राहणार असल्याची माहिती तत्कालीन शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी दिली होती. संबंधित निर्णय हा इयत्ता 9 वी साठी सुद्धा लागू होणार आहे. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! गुणपत्रिकेवरुन 'अनुत्तीर्ण' शेरा हटवण्यात येणार.
दरम्यान 10 वीची परिक्षा 12वी प्रमाणेच महाराष्ट्र बोर्डाकडून पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण अशा 9 विभागीय मंडळांमध्ये घेतली जाणार आहे. त्यामुळे साहजिकच हे सर्व बदल राज्यात सर्वत्र लागू होणार आहेत. सकाळच्या सत्रात पेपर असल्यास 10.30 वाजता, तर दुपारच्या सत्रात पेपर असल्यास 2.30 वाजता उपस्थित राहणे आवश्यक आहे. उत्तरपत्रिका आणि पुरवण्यांची अदलाबदल होऊ नये, म्हणून सर्व पुरवण्या आणि उत्तरपत्रिकांवर बारकोडची छपाई करण्यात आली आहे.