Coronavirus in Maharashtra: महाराष्ट्रात आज कोरोना विषाणूच्या 11,852 रुग्णांची नोंद; सध्या 1,94,056 संक्रमित रुग्णांवर उपचार सुरु

यासह आज नवीन 11,158 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 5,73,559 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.

Medical workers (Photo Credits: IANS)

महाराष्ट्र (Maharashtra) राज्यात आज कोरोना विषाणूचे (Coronavirus) 11,852 रुग्ण आढळले आहेत. यासह आज नवीन 11,158 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 5,73,559 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात सध्या एकूण 1,94,056 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 72.37% झाले आहे. आज महाराष्ट्रामध्ये 184 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशा प्रकारे एकूण 24,583 रुग्ण दगावले आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी याबाबत माहिती दिली.

आज नोंद झालेल्या एकूण 184 मृत्यूंपैकी 143 मृत्यू हे मागील 48 तासातील, तर 32 मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित 9 मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 41, 38, 939 नमुन्यांपैकी 7,92,541 नमुने पॉझिटिव्ह (19.14 टक्के) आले आहेत. राज्यात 13,55,330 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 35,722 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर 3.1 टक्के एवढा आहे. सध्या मुंबईमध्ये 20,551, ठाण्यात 21,375, पुण्यात 52,712, नाशिक येथे 11,614 तर नागपूर येथे 11,701 सक्रीय रुग्ण आहेत. (हेही वाचा: धारावीत आज 15 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, सध्या 94 रुग्णांवर उपचार सुरू)

एएनआय ट्वीट -

दरम्यान, राज्यात आज ‘मिशन बिगीन अगेन’अंतर्गत अनेक बाबींमध्ये सूट देत  व अर्थचक्रास गती देण्यासाठी 2 सप्टेंबर 2020 पासून खाजगी बसमधून प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याशिवाय कोणत्याही निर्बंधाशिवाय यापुढे आऊटडोर किंवा खुल्या जागेमध्ये व्यायाम आदी कार्ये करता येतील. हॉटेल (उपहारगृहे )आणि लॉज (निवासगृहे) यांना 100 टक्के क्षमतेने सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे आता आता आंतरजिल्हा प्रवासी व मालवाहतुकीसाठी कोणतेही निर्बंध राहणार नाहीत. शिवाय त्यासाठी ई-परमिट/संमती/स्वतंत्र परवानगीची गरज भासणार नाही.