Maharashtra Rains Updates: दरड कोसळून मोठा अपघात, रायगड जिल्ह्यात 36, साताऱ्यात 8 ठार; अनेक बेपत्ता, घरं मातीच्या ढिगाऱ्याखाली

मुसळधार पवासामुळे (Maharashtra Rains Updates) राज्यात विविध जिल्ह्याध्ये मोठे अपघात घडले आहेत. प्रामुख्याने रायगड (Raigad District) आणि सातारा जिल्ह्यात दरड कोसळण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडल्या. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील तळई येथे दरड कोसळून (Raigad Landslide) झालेल्या अपघातात 32 जण ठार झाल्याचे वृत्त आहे.

Raigad Landslides | (Photo Credits: ANI)

मुसळधार पवासामुळे (Maharashtra Rains Updates) राज्यात विविध जिल्ह्याध्ये मोठे अपघात घडले आहेत. प्रामुख्याने रायगड (Raigad District) आणि सातारा जिल्ह्यात दरड कोसळण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडल्या. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील तळई येथे दरड कोसळून (Raigad Landslide) झालेल्या अपघातात 32 जण ठार झाल्याचे वृत्त आहे. रायगडमध्ये आतापर्यंत पावसामुळे 36 जणांचा मृत्यू झाला आहे. अद्यापही मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. 42 जण अद्याप बेपत्ता आहेत. दरम्यान, सातारा जिल्ह्यातही पाटण तालुक्यात दरड कोसळून (Satara Landslides) दुर्घटना घडल्याचे वृत्त आहे. या दुर्गटनेत चार घरं ढिगाऱ्याखाली दबली असून, 14 जणांचा शोध सुरु असल्याची माहिती आहे. साताऱ्यात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या दुर्घटनेत 8 जण ठार झाल्याची माहिती आहे. 27 जणांना सुखरुप वाचविण्यात यश आले आहे.

रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील तळई येथी दुर्घटना अतिषय भीषण आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते खचले आहेत. त्यामुळे वाहतुकीस अडथला निर्माण झाला आहे. परिणामी एनडीआरएफची टीम आणि प्रशासन मदत घेऊन घटनास्थळी पोहोचण्यास बराच विलंब लागत आहे. त्यातच मुसळधार पाऊस सुरु झाला की पुन्हा मदत आणि बचाव कार्यास अडथळा येत आहे. त्यातच अंधार पडला की बचाव आणि मदतकार्य पूर्ण क्षमतेने करता येत नाही. त्यामुळे दिवस मावळण्यापूर्वीच मोठ्या प्रमाणावर मदत आणि बचाव कार्य राबवून लोकांचे प्राण वाचवणे आणि त्यांना सुरक्षीत ठिकाणी पोहोचविणे आवश्यक आहे. (हेही वाचा, Konkan Flood Updates: प्रविण दरेकर, गिरीश महाजन माणगाव येथे अडकले; जीव मुठीत घेऊन नागरिक बसच्या टपावर)

एएनआय ट्विट

एएनआय ट्विट

दरम्यान, महाड येथील तळई येथील गावात ज्या ठिकाणी दरड कोसळली त्या ठिकाणी विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, पालकमंत्री आदिती तटकरे आणि आमदार भरत गोगावले घटनास्थळी दाखल झाले आहेत. या सर्वांनी गावकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. तसेच, मदत आणि बचाव कार्याचा आढावाही घेतला.

एएनआय ट्विट

सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मोरणा भआगात असलेल्या आंबेघर येथे दरड कोसळली. आंबेघर येथे अनेक घरं मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली आहेत. घरांचा आणि त्यात अडकलेल्यांचा आकडा समजू शकला नाही. अनेक ठिकाणी रस्ते खचले आहेत. काही ठिकाणी पुलांवरुन पाणी वाहते आहे. त्यामुळे मदत आणि बचावकार्य करणाऱ्या प्रशासन आणि एनडीआरएफच्या दलालाही घटनास्थळी पोहोचण्यास विलंब होत आहे. त्यामुळेही मदत आणि बचावकार्यास विलंब होत आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement