Bhima Koregaon Anniversary: कोरेगाव भीमा येथे 30 डिसेंबर ते 2 जानेवारीपर्यंत जमावबंदी कायदा लागू
कोरेगाव-भीमा (Koregaon Bhima) येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी 1 जानेवारीला देशभरातील अनुयायी येत असतात.
कोरेगाव-भीमा (Koregaon Bhima) येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी 1 जानेवारीला देशभरातील अनुयायी येत असतात. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 1 जानेवारी रोजी कोरेगाव-भीमा परिसरात गर्दी टाळण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासनाने येत्या 30 डिसेंबर ते 2 जानेवारीपर्यंत या कालावधीत रात्री अकरा ते सकाळी सहा वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन शौर्य सोहळा नागरिकांनी घरात राहूनच अभिवादन करावे, असे आवाहन विविध संघटनांनी केले आहे.
कोरेगाव भीमा येथे दरवर्षी एक जानेवारी रोजी महाराष्ट्रसह बाहेरील राज्यांतून लाखो भीम अनुयायी विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी येतात. मात्र, सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता शासनाच्यावतीने सर्वच सन उस्तव व कार्यक्रमांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाप्रमाणे 1 जानेवारी रोजी देखील दूरदर्शन आणि सोशल मीडियावरून दिवसभर प्रसारण सुरू राहणार आहे. मात्र कोरेगाव-भीमा येथील विजयस्तंभ परिसरात कोणत्याही राजकीय सभा अथवा पुस्तकांचे स्टॉल लावण्यास मनाई करण्यात आली आहे. हे देखील वाचा- Elgar Parishad Event: एल्गार परिषदेच्या कार्यक्रमासाठी परवानगी नाही, पुणे पोलिसांचा निर्णय
एएनआयचे ट्विट-
दरम्यान, काही दिवसांपूर्वी पुण्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख आणि पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या उपस्थितीत शौर्यदिनाच्या पार्श्वभूमीवर एक आढावा बैठक घेण्यात आली होती. या आढावा बैठकीला विविध संघटनांचे पदाधिकारी, स्थानिक ग्रामस्थ, सर्व विभागाचे अधिकारी, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी यांनी उपस्थिती दर्शवली होती.