Maharashtra Political Crisis: धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात भेट? राजकीय वर्तुळात चर्चेला उधान
त्यामुळे या भेटीमागचे नेमके कारण काय याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. राजकीय वर्तुळात याचे विविध अर्थ काढले जात आहेत.
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची शिवसेनेतील बंडाळी त्यांना मुख्यमंत्री पदापर्यंत घेऊन गेली. भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबत झालेल्या भेटीगाठी हे त्यामागचे प्रमुख कारण ठरले. परिणामी महाविकासआघाडी सरकार सत्तेतून पायउतार झाले. शिवसेनेतील बंडाळीनंतर इतर पक्षांमध्येही असे काही घडू शकते असी भावना काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्ती केली. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेत धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांतून झळकले. त्यामुळे या भेटीमागचे नेमके कारण काय याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. राजकीय वर्तुळात याचे विविध अर्थ काढले जात आहेत.
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून काल (30 जून) रोजी शपथ घेतली. त्यानंतर त्याच दिवशी साधारण साडेबारा ते एक वाजणेच्या सुमारास धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात भेट झाली. या भेटीचे वेगवेगळे अर्थ राजकीय वर्तुळात काढले जात आहेत. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात मंत्री राहिलेल्या धनंजय मुंडे यांनी अशी देवेंद्र फडणवीस यांची तडकाफडकी भेट का घेतली असवी? याबाबत अनेकांनी भूवया उंचावल्या आहेत. (हेही वाचा, Maharashtra Political Crisis: मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवसेनेने औरंगाबादचा मुद्दा उचलून धरल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या छावणीत तणाव)
'आज तक'ने दिलेल्या वृत्तानुसार देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंल्यावर धनंजय मुंडे यांनी उपस्थिती लावली. या ठिकाणी ते जवळपास अर्धा तास थांबले. दोघांमध्ये काही वेळ भेटही झाली. दरम्यान, दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाल याचा तपशील बाहेर आला नाही. मात्र, भाजपचे वादळ शिवसेना मार्गे आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तर येणार नाही ना? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. राजकीय वर्तुळात चर्चा आहे की, शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेमध्येही बरेच काही अलबेल चालले नाही. राष्ट्रवादीचाही एक गट भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.