Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील आजची सुनावणी संपली, काय घडलं कोर्टात?
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध बाळासाहेबांची शिवसेना यांनी परस्परांविरुद्ध दाखल केलेल्या याचिकांवर ही सुनावणी पार पडली. दरम्यान, आज सुनावणी पार पडली. मात्र, ती पूर्ण होऊ शकली नाही.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) आज पाच न्यायाधीशांच्या घटनापिठासमोर (Constitution Bench) सुनावणी पार पडली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray ) विरुद्ध बाळासाहेबांची शिवसेना (Balasahebanchi Shiv Sena) यांनी परस्परांविरुद्ध दाखल केलेल्या याचिकांवर ही सुनावणी पार पडली. दरम्यान, आज सुनावणी पार पडली. मात्र, ती पूर्ण होऊ शकली नाही. उद्धव ठाकरे यांच्या वतीने ज्येष्ठ वकील कपील सिब्बल ( Kapil Sibal), अभिषेक मनु सिंघवी (Abhishek Singhvi) यांनी बाजू मांडली. तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील 'बाळासाहेबांची शिवसेना' या पक्षाकडून जेष्ठ वकील हरीश साळवे ( Harish Salve) हे ऑनलाईन पद्धतीने सुनावणीला उपस्थित होते.
आजच्या सुनावणीत कपील सिब्बल यांनी दीर्घ युक्तीवाद केला. सकाळी 11 वाजलेपासून सुरु झालेला युक्तीवाद कोर्टाचे कामकाज संपेपर्यंत सुरुच होता. शेवटच्या काही मिनिटांध्ये अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तीवाद केला. दरम्यान, कपील सिब्बल यांचा युक्तीवाद अद्याप संपला नाही. सिब्बल यांनी जवळपास अडीच तासांहून अधिक काळ युक्तीवाद केला. आजच्या युक्तिवादांमध्ये त्यांनी विवध पैलू सविस्तर मांडले. खास करुन पक्षांतरबंदी कायदा, विधानसभा अध्यक्षांचे अधिकार, अरुणाचल प्रदेशमधील एका नबाम रेबिया (Nabam Rebia) प्रकरणात सर्वच्च न्यायालयाने दिलेला निकाल या सर्व बाबींचा सखोल उहापोह करण्यात आला. (हेही वाचा, Shiv Sena Party Symbol: शिवसेना कोणाची? शिंदे-ठाकरे गट सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात होणार महत्त्वपूर्ण सुनावणी)
दरम्यान, राज्याती घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांचे वर्तन, त्यांचे निर्णय, अधिकार आणि भूमिका यावरही कपील सिब्बल यांनी भक्कम युक्तीवाद केला. एकनाथ शिंदे आणि शिवसेनेतील आमदारांनी केलेले बंड कायदा आणि नियमांच्या कसोटीवर कसे दुबळे ठरते याबाबत कपील सिब्बल यांनी सविस्तर विवेचन न्यायालयासमोर केले. दुसऱ्या बाजूला अभिषेख मनू सिंघवी यांनीही जोरदार युक्तीवाद केला. (हेही वाचा, Uddhav Thackeray: रायगड जिल्ह्यातील असंख्य पदाधिकाऱ्यांचा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत पक्षप्रवेश)
बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाकडून हरीश साळवे हे ज्येष्ठ वकील कोर्टात ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते. कपील सिब्बल यांच्या युक्तिवादावर घेतलेले काही आक्षेप वगळता. साळवे यांना युक्तिवाद करण्याची संधी मिळाली नाही. कपील सिब्बल यांचा युक्तीवाद अद्यापही बाकी आहे. त्यामुळे उद्या सिब्बल यांचा युक्तीवाद संपल्यानंतर हरीश साळवे यांना युक्तिवाद करण्यास संधी मिळण्याची शक्यता आहे.