Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष, भावनिक आवाहन करत कपिल सिब्बल यांनी संपवला युक्तीवाद, काय घडलं कोर्टात?
SC Hearing on Maharashtra Power Struggle:महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) घटनापीठासमोर (Constitution Bench) सुरु असलेल्या सुणावणीदरम्यान उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी जोरदार युक्तीवाद केला
SC Hearing on Maharashtra Power Struggle:महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) घटनापीठासमोर (Constitution Bench) सुरु असलेल्या सुणावणीदरम्यान उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी जोरदार युक्तीवाद केला. युक्तिवाद संपवताना सिब्बल यांनी न्यायालयाला भावनिक आवाहनही केले. दरम्यान, सरन्यायाधीशांनी महत्त्वपूर्ण टीप्पणीही केली. सुप्रिम कोर्टात आज ठाकरे आणि शिंदे यांच्या वकिलांमध्ये फेरयुक्तीवाद होत आहे.
कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद संपवताना न्यायालयाच्या आणि भारतीय लोकशाहीच्या महान इतिहासाची आठवण करु दिली. या वेळी त्यांनी म्हटले की, या न्यायालयाला मोठा इतिहास आहे. जो नेहमीच घटनेच्या तत्वांच संरक्षण करत राहिला आहे. याच न्यायायात एडीएम जबलपूरसारखे काही वेगळेही प्रसंग पाहायला मिळाले. पण त्या प्रकरणांइतकंच हे प्रकरणही अतिशय महत्त्वाचे आणि प्रभावी ठरणारं आहे. असं भावनिक अवाहन सिब्बल यांनी केले. (हेही वाचा, 'राज्यपालांचे पत्र सरकार पाडण्याचे पहिले पाऊल', महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर घटनापीठाची महत्त्वाची टिप्पणी)
दरम्यान, आपल्या युक्तिवादात सिब्बल यांनी शिवसेना प्रतोद सुनील प्रभू यांना पदावरुन हटविण्याबद्दलच्या पत्रावरुनही सिब्बल यांनी आक्षेप घेतले. या लोकांनी (शिंदे गट) आसाममध्ये बसून सुनील प्रभू यांची नियुक्ती कोणत्या आधारावर रद्द केली. त्याची प्रक्रिया नेमकी काय आहे? ते तर 1019 पासून प्रतोद पदावर आहेत. महत्त्वाचे म्हणजे राज्यपालांनी उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात ज्या व्यक्तीला पदावरुन दूर केले. त्याच व्यक्तीला मान्यता कशी काय दिली याबबत प्रश्न उत्पन्न होतो, असे सिब्बल म्हणाले.