Maharashtra Police Bharti 2024: महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रिया आजपासून राज्यभरात सुरु; जाणून घ्या तपशील

यामध्ये पोलीस आयुक्तालय, ग्रामीण पोलीस, रेल्वे पोलीस व राज्य राखीव दलातील (एसआरपीएफ) अंमलदार (शिपाई), विभागातील चालक पदांचा समावेश आहे. महत्त्वाचे म्हणजे आजपासून मैदानी चाचणीतून भरती (Maharashtra Police Bharti 2024) प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

Maharashtra Police Bharti | (File Image)

महाराष्ट्र पोलीस भरती (Maharashtra Police Recruitment 2024) प्रक्रियेस आज म्हणजेच 19 जूनपासून राज्यभरात सुरुवात झाली आहे. राज्यभरातील विविध जिल्हे आणि ठिकाणांवरुन पोलीस दलातील हजारो पदे भरली जाणार आहेत. यामध्ये पोलीस आयुक्तालय, ग्रामीण पोलीस, रेल्वे पोलीस व राज्य राखीव दलातील (एसआरपीएफ) अंमलदार (शिपाई), विभागातील चालक पदांचा समावेश आहे. महत्त्वाचे म्हणजे आजपासून मैदानी चाचणीतून भरती (Maharashtra Police Bharti 2024) प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. ही पदभरती जिल्हानिहाय वेगवेगळी असणार आहे. त्यमुळे एकूण जागांच्या तुलनेत दाखल झालेल्या अर्जांची संख्या हजारोंच्या घरात आहे.

17,471 पदांसाठी पोलीस भरती

महाराष्ट्र राज्य पोलीस विभागाकडून पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 बाबत एक अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार राज्यभरात तब्बल 17,471 पदे भरली जाणार आहेत. या भरती साठीची प्रक्रिया सुरु झाली आहे. पोलीस कॉन्स्टेबल, पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर, जेल कॉन्स्टेबल, सशस्त्र पोलीस कॉन्स्टेबल आणि पोलीस कॉन्स्टेबल बँड्समन यांसह इतरही काही पदांसाठी ही भरती असेल. ही भरती रिक्त पदांसाठी असेल. (हेही वाचा, Maharashtra Police Bharti : तयारीला लागा! राज्यात मेगा पोलीस भरतीला सुरूवात; तब्बल १७ हजार पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू)

भरती दरम्यान उमेदवारांना मुलभूत सुविधा उपलब्ध

दरम्यान, राज्य राखीव पोलीस बलाच्या गट क्रमांक 14 येथे 8 ते 11 जुलै या कालावधीत भरती प्रक्रिया पार पडेल. शेवटच्या दिवशी महिला उमेदवारांची चाचणी होणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, अधिक माहिती देताना सांगण्यात आले की, सध्या पावसाळा सुरु आहे. त्यामुळे पाऊस पडल्याने जर भरती प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला तर त्यासाठी पुढची तारीख देण्यात येईल. शिवाय उमेदवारांना भरती प्रक्रियेवेळी पाणी, अल्पोपहार आणि इतर वैद्यकीय मदतही उपलब्ध करुन दिली जाईल.

विशेष पथकाची स्थापना

भरती प्रक्रियेदरम्यान केल्या जाणाऱ्या अनधिकृत कृती, मदत, घोटाळा अथवा इतर कोणत्याही संशयास्पद बाबींवर पोलीस प्रशासनाचे बारीक लक्ष असणार आहे. उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार टाळण्यासाठी आणि तत्सम कृत्य करणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी स्वतंत्र पथकांचीही व्यवस्था करण्यात आल्याचे प्रशासनाने पत्रकार परिषदेदरम्यान सांगितले.

निलेश लंके यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

दरम्यान, नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी राज्यचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ही भरती काही काळ स्थगित करावी अथवा थांबवावी असे म्हटले आहे. राज्यात सध्या पावसाळा सुरु आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी भरती प्रक्रियेत अडथळा निर्माण होण्याचीच अधिक शक्यता आहे. त्यामुळे पावसाचा जोर ओसरल्यानंतर भरती प्रक्रिया पुन्हा सुरु करावी अशी निलेश लंके यांची मागणी आहे. याबाबत त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही एक पत्र लिहीले आहे. दरम्यान, ही भरती आजपासून सुरु झाली आहे. त्यामुळे लंके यांच्या पत्रावर विचार केला जाणार की नाही याबातब अद्याप स्पष्टता नाही.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif