महाराष्ट्रात पोलीस दलात गेल्या 24 तासात आणखी 33 जणांची COVID19 ची चाचणी पॉझिटिव्ह तर एका कर्मचाऱ्याचा मृत्यू

तसेच कोरोनाच्या विरोधात विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुद्धा करण्यात येत आहेत.

Maharashtra Police (Photo Credits: Twitter/ ANI)

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच कोरोनाच्या विरोधात विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुद्धा करण्यात येत आहेत. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 5 लाखांच्या पार गेल्याची आकडेवारी नुकतीच समोर आली आहे. याच दरम्यान, कोविड वॉरिअर्स म्हणून काम करणाऱ्या पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना सुद्धा बहुसंख्येने कोरोनाची लागण होत असल्याचे दिसून येत आहे. तर गेल्या 24 तासात पोलीस दलातील आणखी 33 जणांनी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

राज्यातील एकूण 12,290 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 9,850 जणांनी कोरोनावर मात केली असून 2315 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. त्याचसोबत आतापर्यंत 125 पोलीस दलातील कर्मचाऱ्यांनी आपला जीव कोरोनामुळे गमावला आहे. सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीत 55 हून अधिक वय असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी काम करु नये असा निर्णय घेण्यात आला आहे.(Coronavirus in Maharashtra: कोरोना व्हायरसचे तुमच्या जिल्ह्यात किती आहेत रुग्ण; जाणून घ्या महाराष्ट्रातील जिल्हानिहाय आकडेवारी)

दरम्यान, काल महाराष्ट्रात आणखी 12,614 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 6844 जणांची प्रकृती सुधारली आहे. तसेच 322 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. तर राज्यात 1,56,409 अॅक्टिव्ह रुग्ण, 4,08,286 जणांची प्रकृती सुधारली आहे. त्याचसोबत एकूण 19,749 जणांनी कोरोना व्हायरसमुळे आपला जीव गमावला आहे.