Police Constable Dies By Suicide: मुंबईत पोलीस कर्मचाऱ्याची गळफास लावून आत्महत्या, तपास सुरू

यातच मुंबई पोलीस (Mumbai Police) दलामध्ये कार्यरत असलेले 40 वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Image used for representational purpose (Photo Credits: ANI)

महाराष्ट्रात (Maharashtra) गेल्या काही दिवसांपासून पोलीस आत्महत्येच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. यातच मुंबई पोलीस (Mumbai Police) दलामध्ये कार्यरत असलेले 40 वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी (MIDC Police) एडीआर अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.

सुरेश चव्हाण असे आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे. सुरेश चव्हाण हे मुंब्रा पोलीस ठाण्यात हवालदार म्हणून कार्यरत होते. चव्हाण यांची पत्नी आणि दोन मुले रक्षाबंधन सणानिमित्त नातेवाईकांच्या घरी गेले होते. चव्हाण यांचे कुटुंबिय जेव्हा काल संध्याकाळी उशिरा घरी पोहोचले. दरम्यान, अनेकदा दरवाजा ठोठवल्यानंतरही त्यांना काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर शेजाऱ्याने त्यांचा घराचा दरवाजा तोडून आत गेले असता चव्हाण यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. ज्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. हे देखील वाचा- Jyotsna Meshram: डॉ. ज्योत्स्ना मेश्राम यांची आत्महत्या, नागपूरच्या शैक्षणिक क्षेत्राला हादरवणारी घटना

या घटनेची माहिती होताच एम.आय.डी.सी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर चव्हाण यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवला आहे. चव्हाण यांनी आत्महत्या का केली? याचा पोलीस तपास करीत आहेत. तसेच घटनास्थळी कोणतीही सुसाईट नोट सापडली नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

यापूर्वी अलिबाग येथे मंत्र्याच्या डिव्ही कारवर चालक म्हणून काम करीत असलेल्या एका पोलिसाने शिवाजी नगर येथे आपल्या राहत्या घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. नाईक प्रशांत ठाकूर (वय, 35) असे मृत पोलिसाचे नाव आहे. घरगुती कारणामुळे प्रशात याने आत्महत्या केली असल्याचे बोलले जात आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif