नागपूर विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. ज्योत्स्ना मेश्राम (Jyotsna Meshram) यांनी आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मेश्राम यांच्या आत्महत्येनंतर शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, पती सुधीर मेश्राम यांच्या निधनानंतर त्या तणावात होत्या. त्यातूनच जोत्स्ना मेश्राम यांनी त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
जोत्स्ना मेश्राम (वय, 52) बेलतरोडी येथील फॉर्च्युन श्री अपार्टमेंटमध्ये राहत होत्या. त्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागाच्या प्रमुख म्हणून काम पाहत होत्या दरम्यान, आज दुपारी 4.30 वाजताच्या सुमारास राहत्या बिल्डिंगच्या नवव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेची माहिती होताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी जोस्त्ना यांच्या मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे. हे देखील वाचा- Maharashtra: वेठबिगाराच्या आत्महत्येप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यास अटक, नेमके प्रकरण काय? घ्या जाणून
दरम्यान, जोत्स्ना मेश्राम यांचे सुधीर मेश्राम यांचे यावर्षी मार्च महिन्यात निधन झाले होते. पतीच्या निधनापासून जोत्स्ना मानसिक तणावात होत्या. यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत. जोत्स्ना यांच्या पश्चात मुलगा सिद्धार्थ आणि मोठा आप्तपरिवार आहे.