IPL Auction 2025 Live

Maharashtra: कॉन्स्टेबल भर्तीसाठी आलेल्या तरुणाने कॉपी करण्यासाठी लढवली शक्कल, मास्कमध्ये लावले इलेक्ट्रॉनिक डिवाइस

मात्र कोरोनाच्या काळात स्वत:ची सुरक्षितता व्हावी यासाठी मास्क घालणे अनिवार्य असल्याचे सांगण्यात आले आहे. अशातच एका तरुणाने कॉन्स्टेबल पदाच्या भर्ती परीक्षेवेळी मास्कमध्ये बॅटरीसह सीम-माइक लावल्याचा प्रकार समोर आला आहे.

Electric Device in Mask (Photo Credits-ANI)

Maharashtra: परीक्षेत कॉपी करण्याचे विविध प्रकार आतापर्यंत समोर आले आहेत. मात्र कोरोनाच्या काळात स्वत:ची सुरक्षितता व्हावी यासाठी मास्क घालणे अनिवार्य असल्याचे सांगण्यात आले आहे. अशातच एका तरुणाने कॉन्स्टेबल पदाच्या भर्ती परीक्षेवेळी मास्कमध्ये बॅटरीसह सीम-माइक लावल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना पिंपरी-चिंचवड येथील आहे.(Pune Suicide Case: पुण्यात नाईट क्लबमध्ये काम करणाऱ्या 26 वर्षीय वेटरची 13व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या)

पिंपरी-चिंचवड येथील हिंजेवाडी मधील पोलीस कॉन्स्टेबल भर्तीसाठी परीक्षा आयोजित करण्यात आली होती. याच दरम्यान एका तरुणाने आपल्या मास्कमध्ये इलेक्ट्रॉनिक डिवाइस लावले होते. तर पोलीस आयुक्तांनी माहिती देत असे म्हटले की, तरुणाची तपासणी केली असता त्याच्या मास्कमध्ये इलेक्ट्रॉनिक्स डिवाइस लावण्यात आलेला मास्क जप्त केला.(Online Fraud Case: रायगड मध्ये 55 वर्षीय व्यक्तीची ऑनलाईन खरेदी दरम्यान 2.83 लाखांची फसवणूक)

Tweet:

त्यांनी पुढे असे म्हटले की, तरुणाने घातलेल्या मास्कमधअये सिम कार्ड, माइक आणि बॅटरी होती. दरम्यान, तरुणाचा मास्क जप्त केला गेला पण आरोपी तेथून पळ काढण्यात यशस्वी झाला. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.