खासगी शाळांमधील फी वाढीचा वाद आता समितीकडून सोडवला जाणार- शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

त्यामुळे फी वाढीच्या विरोधात यापूर्वी शाळेच्या बाहेर पालकांकडून आंदोलन सुद्धा करण्यात आले होते. राज्यातील खासगी शाळांमधील फी वाढ बाबत तक्रार असल्यास त्यासाठी आठ विभागिय समिती स्थापन करण्यात येणार आहे.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: ANI)

खासगी शाळांमध्ये वाढत्या फी दरवाढीमुळे त्याचा चांगलाच फटका पालकांना बसतो. त्यामुळे फी वाढीच्या विरोधात यापूर्वी शाळेच्या बाहेर पालकांकडून आंदोलन सुद्धा करण्यात आले होते. राज्यातील खासगी शाळांमधील फी वाढ बाबत तक्रार असल्यास त्यासाठी आठ विभागिय समिती स्थापन करण्यात येणार आहे. त्यानुसार फी वाढीबाबत तक्रार करता येणार असल्याचे सोमवारी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे. तसेच फी वाढीबाबत नेहमीच विद्यार्थ्यांचे पालक आणि शाळेचे व्यवस्थापन यांच्यामध्ये वाद निर्माण होत असल्याचे दिसून येते. पालकांकडून स्थानिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे याबाबत तक्रार करतात. परंतु त्यावर उत्तर देण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे शाळेतील फी वाढीसंबंधित तक्रार निवारण करण्यासाठी लवकरात लवकरच समितीची स्थापना करण्यात येणार आहे.

फी वाढीबाबातचा कायदा समितीकडून पाळला जाणार आहे. पण सरकारकडून मुंबई आणि पुणे येथे समिती स्थापन करण्यात आली असून ती अद्याप कार्यरत नसल्याचे ही स्पष्ट करण्यात आले आहे. तर 2017 मध्ये दोन शाळांच्या पालकांना उच्च न्यायालयात फी वाढीबाबत धाव घेतली होती. तर फी वाढीमुळे शाळांची मनमानी चालवून घेतली जाणार नसल्याचे पालकांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते.(IIT MTech फीमध्ये तब्बल 900 % वाढ; तीन वर्षांतच पूर्ण करावा लागेल अभ्यासक्रम, जाणून घ्या नवे शुल्क)

तर शाळेची फी निश्चित करण्याचे अधिकार पालक शिक्षण संघटनेच्या कार्यकारी समितीला देण्यात आले आहेत. तर फी वाढीबाबत प्रस्ताव मान्य होण्यापूर्वी फीची रक्कम कोणत्या निकषावर ठरवण्यात आली आहे हे पाहणे महत्वाचे असते.