महाराष्ट्र: कोल्हापूर मध्ये पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली

तर पाणलोट क्षेत्रात पाऊस पडल्यानंतर काही धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

महाराष्ट्रातील कोल्हापूर (Kolhapur) मध्ये पंचगंगा नदीने (Panchganga River) धोक्याची पातळी मंगळवारी सकाळी ओलांडली आहे. तर पाणलोट क्षेत्रात पाऊस पडल्यानंतर काही धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. विविध धरणांच्या पाणलोट क्षेत्रात ठिकठिकाणी पाऊस पडत असला तरी कोल्हापुरातील राधानगरी व इतर जलाशयातून पाणी सोडले जात असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.(Maharashtra Monsoon Update: पश्चिम महाराष्ट्र, कोकण किनारपट्टीवर 18,19 ऑगस्टसाठी हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी)

 सकाळी राजाराम विर येथील पंचगंगा नदीतील पाण्याची पातळी 40 फूटांवर गेली, ती धोक्याच्या पातळीपासून एक फूट उंच असल्याचे सांगण्यात आले. तर विरची धोक्याची पातळी 43 फूट आहे. सोमवारी राधानगरी धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आले. पण आज फक्त धरणाचे दोन दरवाजे उडत 7,112 क्युसेक वेगाने पाणी सोडण्याचत आले. बाजूला असणाऱ्या सांगलीत मधील इरविन पूलाच्या येथे कृष्णा नदीची पाण्याची पातळी 38.6 फूटांवर पोहचल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे. पुलावरील नदीची धोक्याची पातळी 45 फूट आहे.(High Tide Today: मुंंबईच्या समुद्रात आज 11.39 वाजता उसळणार उंच लाटा, पावसाचा जोर आजही वाढणार- IMD)

जिल्हात सकाळपासूनच कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस कमी झाल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. त्याचसोबत कोयना आणि अन्य जलाशयातून सुद्धा पाणी सोडले जात आहे. गेल्या वर्षात झालेल्या मुसळधार पावसामुळे पुर परिस्थिती निर्माण होत सांगले आणि कोल्हापूर जिल्ह्याचे फार मोठे नुकसान झाले होते.