Palghar Earthquake Tremors: सकाळपासून पालघर 5 वेळा भूकंपाच्या धक्क्याने हादरलं, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

महाराष्ट्रामधील पालघर, तलासरी,डहाणू या भागामध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के बसले आहेत. आज सकाळी 3 ते 3.5 रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के या भागामध्ये जाणावले

Mild tremor hits Palghar district | Representational Image | (Photo Credits: PTI)

Palghar Earthquake Tremors:  आज महाराष्ट्रामधील पालघर (Palghar), तलासरी (Talasari), डहाणू (Dahanu)  या भागामध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के (Earthquake Tremors)  बसले आहेत. आज सकाळी 3 ते 3.5 रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के या भागामध्ये जाणावले. काही महिन्याभरापासून लागोपाठ हा भूकंपाच्या धक्क्यांचा सिलसिला सुरू असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

आज सकाळी 6.58 मिनिटांनी, 10.03 मिनिटांनी आणि 10.29 मिनिटांनी पालघर भूकंपाच्या धक्क्याने हादरलं. या भूकंपाची तीव्रता 3 ते 3.5 असल्याची माहिती देण्यात आली आहे. दुपारी 2.10 मिनिटांनी चौथा धक्का बसला. तर चारच्या सुमारास पाचवा भूकंपाचा धक्का जाणवला आहे.

पालघरला सकाळी बसलेल्या भूकंपाच्या धक्क्याचा व्हीडिओ 

 

मागील काही दिवसांपूर्वी देखील अशाप्रकारे वारंवार पालघर,डहाणू भाग भूकंपाच्या धक्क्याने हादरत होता. काही पालघरवासीयांना यानंतर स्थालांतर करण्याचा निर्णय घेतला आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now