Maharashtra: नागरिकांनो मास्क घाला अन्यथा 200 ऐवजी 500 रुपये दंड भरा

त्यामध्ये मास्क न घातल्यास 200 रुपयांऐवजी आता 500 रुपये दंड स्विकारला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Coronavirus (Photo Credits: IANS)

Maharashtra: महाराष्ट्र सरकारकडून वाढत्या कोरोनाच्या रुग्णांच्या पार्श्वभुमीवर नव्या गाईडलाईन्स जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये मास्क न घातल्यास 200 रुपयांऐवजी आता 500 रुपये दंड स्विकारला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तर नव्या सुचनांनुसार पाचपेक्षा अधिक माणसे रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत एकत्रित जमण्यास बंदी असणार आहे. त्याचसोबत गार्डन्स, बीच, सिनेमागृहे, मॉल्स, ऑडिटोरियम आणि रेस्टॉरंट रात्री 8 वाजता बंद करण्याचे आदेश दिले गेले आहेत. तर येत्या 15 एप्रिल पर्यंत हा नियम लागू असणार असल्याचे राज्य सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सुचनांमध्ये म्हटले आहे.

तर मास्क न घालण्याबद्दल बोलायचे झाल्यास आता 200 ऐवजी 500 रुपये दंड घेतला जाणार आहे. त्याचसोबत सार्वजनिक ठिकाणी थुंकताना दिसल्यास त्या व्यक्तीकडून 1 हजार रुपये दंड स्विकारला जाणार आहे. नव्या सुचना जाहीर केल्यानंतर राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकारी आणि महापालिका अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्याचसोबत जर नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन केल्यास प्रत्येकाकडून 1 हजार रुपयांचा दंड स्विकारला जाणार आहे.(Uddhav Thackeray: होळी आणि धुलिवंदनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जनतेला खास आवाहन)

होळी, गुडी पाढवा, गुड फ्रायडे, ईस्टर सनडे, छत्रपती शिवाजी महाराज जयंती, महात्मा फुले जयंती आणि बाबासाहेब आंबेडकर जयंती वर नव्या नियमांमुळे परिणाम होणार आहे. आजपासून रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत सिनेमागृह, मॉल्स, ऑडिटेरियम आणि रेस्टॉरंट्स बंद राहणार आहेत. मात्र होम डिलिव्हरी सुविधा रेस्टॉरंट्सला सुरु ठेवता येणार आहे.

दरम्याान महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या 35,726 रुग्णांची व 166 मृत्यूंची नोंद झाली आहे.  राज्यामध्ये 14,523 रुग्णांचा डिस्चार्ज देण्यात आला. यासह एकूण संक्रमित रुग्णांची संख्या 26,73,461 झाली आहे. आजपर्यंत राज्यात 23,14,579 रुग्ण बरे झाले आहेत. एकूण मृत्यूची संख्या 54,073 झाली असून, सध्या सक्रिय प्रकरणे 3,03,475 इतकी आहेत.