Maharashta News: ऐन दिवाळीत खासगी ट्रव्हल्सचे तिकिट महागलं, प्रवाशांच्या खिशाला कात्री

त्यामुळे चाकरमान्यांच्या खिशाला यंदा कात्री बसणार आहे. बसच्या भाड्यामुळे प्रवाशी त्रस्त झाले आहे.

Bus | Pixabay.com

Maharashta News:दिवाळीमुळे राज्यातील खासगी ट्रॅव्हल्सचे तिकिट वाढली आहे. त्यामुळे चाकरमान्यांच्या खिशाला यंदा कात्री बसणार आहे. बसच्या भाड्यामुळे प्रवाशी त्रस्त झाले आहे. 2018 मध्ये सरकारने प्रवासांच्या खासगी बसेसकडून होणारी लुटमार थांबविण्यासाठी अध्यादेश काढला होता. सरकारी बसभाड्याच्या फक्त दीडपट भाडे आकारण्याची मुभा राज्य सरकारने खासगी ट्रॅव्हल्सना दिली होती. मात्र पुणे - मुंबईतसह विदर्भात प्रवाशांची लूट होत असल्याची दिसून येत आहेय. चिंतामणी, यवतमाळकर, विदर्भ या खासगी बसच्या तिकिटांमध्ये भर पडली आहे. त्यामुळे आता विदर्भाच्या दिशेन जाणाऱ्या प्रवाशांना फटका बसला आहे.

विदर्भात चाकरमान्याना 500 ते 700 रुपये अधिक मोजावे लागत आहे. चंद्रपूर ते पुणे पर्यंत प्रवाशांना 2600 रुपये द्यावे लागत आहे. पुणे-मुंबईतून विदर्भात दिवाळीसाठी येऊ पाहणाऱ्या चाकरमान्यांना सध्या खाजगी बसच्या तिकिटासाठी दुप्पट ते अडीचपट पैसे मोजावे लागत आहेत. पुणे- मुंबई शहरात कामानिमित्त आलेल्यांना यंदा ही दिवाळी खर्चिक पडणार आहे.

पाहा विदर्भातील खासगी बसचे भाडे-

चंद्रपूर ते छत्रपती संभाजीनगर 

१. स्लीपर एसी बस 2250 रु

२. सिटींग एसी बस 1560 रुपये घेत आहे.

चंद्रपूर ते पुणे

१. स्लीपर एसी बस : 3300 रू

२. सिटींग एसी बस : 2315 रु

चंद्रपूर ते मुंबई

१. स्लीपर एसी बस- 3690 रु

२.  सिटींग एसी बस -2690 रु

पुणे ते अकोला

१. सरकारी शिवशाही- 1180

२.खासगी एसी- 2200 ते 2600

३. नियमानुसार खासगी- 1800

वाढत्या तिकिट पाहून चाकरमानांना प्रवासाचा प्रश्न पडला आहे. त्यामुळे सरकार यावर आळा कधी घालेल असा प्रश्न जनते समोर उभा राहिला आहे.