महाराष्ट्र: लॉकडाउनचे सर्व नियम पाळून घरातल्या घरात वधूवरांचे लग्न, नाशिक पोलिसांनी अनोख्या शैलीत दिल्या शुभेच्छा (Video)

तर राज्यात येत्या 3 मे पर्यंत लॉकडाउनचे आदेश लागू राहणार असल्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. मात्र 3 मे नंतर राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता त्यासंदर्भात निर्णयाची घोषणा केली जाणार आहे.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असल्याने नागरिकांना घराच थांबण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर राज्यात येत्या 3 मे पर्यंत लॉकडाउनचे आदेश लागू राहणार असल्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. मात्र 3 मे नंतर राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता त्यासंदर्भात निर्णयाची घोषणा केली जाणार आहे. लॉकडाउनच्या काळात नागरिक घरात अडकून पडले आहेत. तसेच सरकारने कोणत्याही धार्मिक आणि सांस्कृति कार्यक्रमांना परवानगी नाकारली आहे. त्यामुळे लॉकाउनच्या काळात ज्यांनी यापूर्वीच लग्नाचे मुहूर्त काढले आहेत त्यांचा विवाह सोहळा पुढे ढकलण्यात येत असल्याचा निर्णय आतापर्यंत काही जणांनी घेतला असेलच. पण नाशिक येथे एका नव वधूवराने घरातल्या घरात लॉकडाउनच्या सर्व नियमांचे पालन करत विवाहसोहळा पार पाडला आहे. यामुळे या नवविवाहित जोडप्याचे कौतुक होत असून नाशिक पोलिसांनी त्यांना एका अनोख्या शैलीत शुभेच्छा दिल्या आहेत.

पोलिसांनी असे म्हटले आहे की, नव विवाहीत जोडप्याने कोणत्याच नियमाचे पालन केले आहे. या विवाह सोहळ्याला त्यांनी कोणत्याच उत्सवाचे स्वरुप दिले नाही. मात्र लॉकडाउनंतर तुम्ही सर्वांना पार्टी द्याल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. ऐवढेच नाही तर पोलिसांनी या नव्या वधूवरांसाठी मोबाईलवर 'तेरी जोडी सलामत रहे' हे गाणे लावून त्यांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.(महाराष्ट्र: स्थलांतरित कामगार स्पेशल ट्रेनने घरी जाण्यापूर्वी नागपूर महापालिकेकडून आरोग्य तपासणी, रजिस्ट्रेशन करण्यास सुरुवात)

यापूर्वी सुद्धा मुंबईतील सांताक्रुझ येथे एका मंदिरात एका नवविवाहित वधूवरांनी मास्क घालून लग्न सोहळा पार पाडला होता. त्यावेळी मित्रमंडळी किंवा परिवारांने उपस्थिती लावली नव्हती. या नव विवाहित जोडप्याने सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचे पालन केल्याचे सुद्धा दिसून आले होते.