LPG Price Hike: गॅस दरवाढीवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुण्यात अनोख अंदोलन, चुलीवर भाकऱ्या थापून नोंदवला निषेध

याचे परिणाम सर्व सामान्य नागरिकांच्या जीवनावर होत आहेत.

NCP (Photo Credit: Twitter)

देशातील इंधनाचे दर (Fuel Price) गगनाला भिडल्या असून आता घरगुती गॅस सिलिंडरच्या (LPG Gas Cylinder Price) किंमतीतही वाढ झाली आहे. याचे परिणाम सर्व सामान्य नागरिकांच्या जीवनावर होत आहेत. याच दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून (NCP) महाराष्ट्रात (Maharashtra) ठिकठिकणी आंदोलन पुकारण्यात आली आहेत. परंतु, पुण्यातील (Pune) बालगंधर्व चौकात झालेल्या आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी चक्क चुलीवर भाकरी थापून केंद्र सरकारचा निषेध नोंदवला आहे. याचबरोबर धोरण मोदींचे; मरण सर्वसामन्यांचे, मोदीजी नही चाहिये अच्छे दिन; लौटा दो हमारे बुरे दिन, वाढलेला गॅस कोंडतोय सर्वसामन्यांचा श्वास, अशा आशयाचे फलक झळकवत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे.

इंधन आणि गॅस दरवाढीवरून अमरावती, लातूर, अकोले, पुणे आणि पनवेलसह बऱ्याच ठिकाणी राष्ट्रवादीने आंदोलन केले आहे. दरम्यान, पुण्यात सुरु असलेल्या अंदोलनावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की, केंद्र सरकारकडून पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या दरात सतत वाढ होत आहे, यामुळे सर्वसामन्य नागरिकांना मोठा फटका बसत आहे. यासाठी आज आम्ही चुलीवर भाकरी करून केंद्र सरकारचा निषेध नोंदवला आहे. सरकारने या अंदोलनाची दखल घ्यावी, अन्यथा भविष्यात तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही त्यांनी त्यावेळी दिला आहे. हे देखील वाचा- बेघर, भिकाऱ्यांनी काम करायला हवं; राज्य त्यांना सर्व सुविधा पुरवू शकत नाही- मुंबई हायकोर्ट

देशात मंगळवारी इंधनाच्या दरात 16 वी दरवाढ नोंदवण्यात आली होती. आधीच कोरोना महामारीमुळे आर्थिक संकटाचा सामना करावा लागणाऱ्या नागरिकांना आता महागाईची चिंता सतावत आहे. मुंबई, पुणे, नाशिक औरंगाबादसह महत्त्वाच्या शहरात पेट्रोलच्या दरात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. याचपार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस इंधन दरवाढीवरुन केंद्रासह राज्यातील विरोधी पक्षनेत्यांवर सातत्याने टीका करत आहेत.