Maharashtra-Mumbai Rain Update: राज्यात मेघगर्जनेसह दमदार पावसाची शक्यता तर मुंबईसह उपनगरातही जोरदार सरी

काही दिवसांच्या विश्रांतीनंतर आता राज्यभरात पुन्हा पावसाने कमबॅक केलं आहे.

Heavy Rain | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र आता पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. येत्या ३ ते ४ दिवसात राज्यात गडगडाटासह पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. राज्यासोबत देशभरात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. आता पुढचे काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. दरम्यान विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे नारिकांनी सतर्क राहावे असे आवाहन करण्यात येत आहे. तसेच मुंबईसह (Mumbai) उपनगरातही पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. हवामान विभागाकडून संबंधीत सुचना देण्यात आल्या आहेत. गेले २४ तासात मुंबई आणि उपनगरात रेकॉर्ड ब्रेक पावसाची नोंद करण्यात आली आहे. दादर (Dadar)परिसरात सर्वाधीक पावसाची नोंद करण्यात आली असुन भायखळा (Byculla), महालक्ष्मी (Mahalaxmi), मरिन लाईन्स (Marine Lines), वांन्द्रे (Bandra) या भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे.

 

कोकणात (Konkan) पावसाने कालपासून चांगलाच जोर पकडला आहे. मराठवाडा (Marathwada), पश्चिम महाराष्ट्रातील (North Maharashtra) आणि विदर्भाच्या (Vidarbha) विविध जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. विदर्भातील भंडारा (Bhandara), गोंदिया (Gondia), नागपूर (Nagpur) या जिल्ह्यांना पावसानं झोडपून काढलं आहे. शहरी भागात पावसाचा जोर कमी असला तरी ग्रामीण भागात मात्र जोरदार पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे. तरी आजपासून पुढील तीन दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, अशा सुचना हवामान विभागाकडून देण्यात आल्या आहेत. (हे ही वाचा:- Nashik Bus Fire: नाशकात खाजगी बसला भीषण आग, दुर्घटनेत 11 प्रवाशांचा मृत्यू; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर)

पुणे (Pune), नाशिक (Nashik), ठाणे (Thane), कल्याण (Kalyan), पालघर (Palghar) आणि नवी मुंबई (Navi Mumbai) या भागात विजांच्या कडकडाटासह मुसधार पावसाचा (Heavy Rain) अंदाज आहे. तरी काही दिवसांच्या विश्रांतीनंतर आता राज्यभरात (Maharashtra) पुन्हा पावसाने कमबॅक (Come Back) केलं आहे. मराठवाड्यासह (Marathwada) उत्तर महाराष्ट्रात (North Maharashtra) पावसाची जोरदार बॅटींग (Bating) बघायला मिळत आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील (Western Maharashtra) काही भागात मध्य रात्री पाऊस पावसाच्या सरी कोसळत आहे.