Maharashtra Monsoon Weather Forecast: पुणे, रत्नागिरी, सातारा सह महाराष्ट्रात हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी; गडगडाटी वादळासह पावसाची शक्यता
स्कायमेट या खाजगी हवामान अंदाज वर्तवणार्या संसथेने दिलेल्या इशार्यानुसार, दक्षिण व मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबईसह महाराष्ट्रात परतीचा पावसाला सुरूवात झाली आहे. काल (9 ऑक्टोबर) च्या संध्याकाळी अचानक पुण्यात झालेल्या धुव्वाधार पावसामुळे काही काळ पुण्याची तुंबई झाली होती. आजही पश्चिम किनारपट्टीवर मुंबई, कोकण, गोवा सह राज्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटांसह रिमझिम पावसाची बरसात पहायला मिळाली. कोल्हापूर सोबतच सांगली, सोलापूर, सातारा, पुणे आदी जिल्ह्यांत आगामी दोन दिवसांत 60 ते 100 मिलिमीटर पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी करण्यात आला आहे.
पुणे शहरात आज संध्याकाळी अनेक शाळा 2 तास आधीच सोडण्यात आल्या आहे. स्कायमेट या खाजगी हवामान अंदाज वर्तवणार्या संसथेने दिलेल्या इशार्यानुसार, दक्षिण व मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच कोकणात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाच्या सरी बरसतील. गेल्या 24 तासांत कोकणात अतिमुसळधार पाऊस पडल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. पश्चिम महाराष्ट्रात 12 ऑक्टोबर पर्यंत वीजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज; शेतकर्यांना पीक सुरक्षित ठेवण्याचं कृषी विभागाकडून आवाहन
दसर्याच्या रात्री पासूनच मुंबई, पुण्यात पावसाने जोर धरला आहे. अचानक वीजांच्याकडकडाटासह पाऊस बरसत असल्याने नगरिकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सोबत कृषी विभागाकडून शेतकर्यांनी काढलेले पीक सुरक्षित ठेवावे असेही सांगण्यात आले आहे.