Maharashtra Monsoon 2020 Forecast: मुंबई, कोकण परिसरात 3, 4 जुलै दिवशी मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याने जारी केला ऑरेंज अलर्ट
त्यानुसार आता मुंबईमध्येही बीएमसीने कंबर कसली आहे.
महाराष्ट्रामध्ये आज (3 जुलै) आणि उद्या (4 जुलै) दिवशी मुंबई सह कोकणकिनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान खात्याने भारताच्या पश्चिम किनारपट्टीसाठी पुढील 48 तासांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार आता मुंबईमध्येही बीएमसीने कंबर कसली आहे. या अतिमुसळधार पावसात नागरिकांना सुरक्षित राहण्यासाठी काही नियमावली जारी केली आहे. शहरात आधीच कोरोना संकट फैलावलं आहे त्यामध्ये पावसाळ्यातील रोग यांच्या सोबतीने कोरोना अधिक बळावू नये म्हणून काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
दरम्यान काल रात्री मुंबई शहर,मध्यवर्ती भागात जोरदार पाऊस पडला आहे. अंदाजे हा 70 मिमी पाऊस झाला आहे. तर इतर भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. कोकणातही रत्नागिरी, रायगड, सिंधुदूर्ग भागात अधून मधून पावसाच्या सरी बरसत आहे. त्यामुळे नागरिकांना घरात सुरक्षित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबई महानगर पालिकेच्या सूचना
दरम्यान आयएमडीने काल जारी केलेल्या संपूर्ण भारतासाठीच्या पावसाच्या अंदाजपत्रामध्ये दिलासादायक बातमी आहे. यंदा महाराष्ट्रासह मध्य भारत जुलै महिन्यामध्ये चांगला पाऊस बरसण्याची शक्यता आहे. हे शेतकर्यांसाठी चांगले चिन्ह असल्याची माहिती हवमान खात्याचे के.एस होसाळीकर यांनी व्यक्त केले आहे.