Maharashtra Monsoon Update: रायगड, पुणे, जळगाव सहित 'या' जिल्ह्यात पुढील 3 तास होणार मुसळधार पाऊस- IMD

आयएमडी मुंबई (IMD Mumbai) च्या माहितीनुसार येत्या तीन तासात महाराष्ट्रात काही जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

Maharashtra Monsoon 2020 | Image Used For Representative Purpose | Photo Credits: unsplash.com

Maharashtra Monsoon Forecast: आयएमडी मुंबई (IMD Mumbai) च्या माहितीनुसार येत्या तीन तासात महाराष्ट्रात काही जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा देण्यात आला आहे. रायगड (Raigad) , पुणे (Pune) , अहमदनगर (Ahmednagar), नाशिक (Nashik), औरंगाबाद (Aurangabad), उस्मानाबाद (Osmanabad) या जिल्ह्यातील काही भागात जोरदार पाऊस होईल असे समजतेय. पुढील तीन तास सलग मुसळधार ते अति जोरदार पाऊस होईल असे अंदाज आहेत. यंदाच्या मान्सून ला सुरवात झाल्यापासून मुंबई , ठाणे व कोकण पट्ट्यात अनेकदा अति वृष्टी झाली आहे मात्र पश्चिम महाराष्ट्र्र, मराठवाडा, विदर्भ या भागात पाऊस मध्यम स्वरूपातच होत आहे. आज मात्र नेहमीपेक्षा जोरदार पावसाच्या सरी बरसणार आहेत.

दुसरीकडे मुंबई ठाणे परिसरात काल पासून पावसाने अगदी दडीच मारली आहे. मागच्या विकेंड ला मुंबई व उपनगरात त जोरदार पाऊस झाला होता, इतका की मुंबईतील हिंदमाता, अंधेरी, लोअर परळ, किंग्स सर्कल सारख्या सखल भागात पाणी सुद्धा साचले होते. कोकणातही वेंगुर्ला, सावंतवाडी या भागात जनजीवन विस्कळीत होईल एवढा पाऊस झाला होता.

ANI ट्विट

दरम्यान, यंदा सरासरीच्या 100 टक्के पाऊस होणार आहे असा हवामान खात्याचा अंदाज आहे. मुंबई, मध्य महाराष्ट्रात यातील 60 टक्के पाऊस झाला आहे, आता मराठवाडा, विदर्भ, या भागात सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोरोनाच्या संकट काळात पावसात भिजू नये, आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन सरकार तर्फे करण्यात आले आहे.