Maharashtra MLC Election Result: शिक्षक व पदवीधर मतदार संघ निवडणूकीच्या निकालावर शरद पवार, चंद्रकांत पाटील ते अनिल देशमुख यांची पहा प्रतिक्रिया काय

त्यामुळे त्यांनी विजयी उमेदवारांचे कौतुक करताना त्यांची भेटदेखील घेतली आहे.

Chandrakant Patil and Sharad Pawar | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या निवडणूकीमध्ये महाविकास आघाडी पहिल्यांदाच भाजपा विरूद्ध एकत्र येऊन लढत होती. त्यामुळे धुळे नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था आणि सोबतीने शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील निवडणूकीच्या निकालाकडे सार्‍यांचे लक्ष होते. दरम्यान या निवडणूकीमध्ये महाविकासआघाडीला सरशी मिळाली आहे. महाविकास आघाडीने वर्षानुवर्षांचा भाजपाचा पुणे आणि नागपूर पदवीधर मतदारसंघामध्ये त्यांचा पराभव केला आहे. विधान परिषदेच्या या निकालामुळे सहाजिकच सध्या शिवसेना, कॉंग्रेस आणि एनसीपीच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे. महाविकास आघाडीच्या यशावर शरद पवार, अजित पवार, अनिल देशमुख यांच्यासह विरोधी पक्षातून चंद्रकांत पाटील यांच्याकडून प्रतिक्रिया समोर येत आहेत. Maharashtra MLC Election 2020 Results: शिक्षक व पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीची सरशी, भाजपाला धक्का; पहा विजयी उमेदवारांची यादी

अजित पवार आणि शरद पवार आज पुण्यामध्येच आहेत. त्यामुळे त्यांनी विजयी उमेदवारांचे कौतुक करताना त्यांची भेटदेखील घेतली आहे. आज सकाळी मीडीयाशी बोलताना शरद पवार यांनी महाविकास आघाडीचं कौतुक केले आहे. महाविकास आघाडीचं एकत्रित येऊन वर्षभर केलेलं काम लोकांनी स्वीकारलं आहे. महाराष्ट्राचं चित्र बदलत आहे. त्याला सर्वसामान्य लोकांचा पाठिंबा आहे. तर चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे. चंद्रकांत पाटील मागच्या वेळेस विधानपरिषदेला कसे निवडून आले यावर बोलताना त्यांच्याविरोधात आमच्यामध्ये एकापेक्षा जास्त उमेदवार होते. त्यामुळे ते निवडून आले. पुणे शहरातील त्याच्या सोयीचा मतदारसंघ निवडला. त्यांना विश्वास असता तर त्यांनी मतदारसंघ निवडला नसता, असा टोला देखील शरद पवार यांनी लगावला आहे.

चंद्रकात पाटील यांनी प्रत्युत्तर देताना एकट्याने आमच्यासमोर येऊन लढून दाखवा. शिवसेना आमचा मित्रपक्ष होता कदाचित आमच्यासोबत असते तर बळ मिळाले असते पण या निवडणूकीमध्ये त्यांना भोपळा मिळाला आहे असे म्हणत शिवसेनेला टोला लगावला आहे. तर सुधीर मुनगंटीवार यांनी आम्ही बेसावध राहिलो असू अशी शक्यता बोलून दाखवली आहे. मतदारांपर्यंत पोहचताना कुठे कमी पडलो याच आत्मचिंतन करू. असे देखील म्हणाले आहेत.

अनिल देशमुख ट्वीट

दरम्यान अनिल देशमुख आणि अजित पवारांनी भाजपाच्या वाचाळवीरांना या निकालामधून जनतेने उत्तर दिल्याचं म्हटलं आहे.

पदवीधर, शिक्षक मतदारसंघातील निवडणूक निकालानंतर मीडियाशी बोलताना  देवेंद्र फडणवीस  यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यावेळेस त्यांनी आम्ही किमान 1 जागा जिंकलो. महाविकास आघाडीतील 2 पक्षांना फायदा झाला पण मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेला एकही जागा न मिळाल्याने त्यांनी आत्मचिंतन करावंं असं म्हणत टोला लगावला आहे.