Maharashtra MLC Election 2020 Results: शिवसेनेला एकाही जागेवर विजय मिळवता न आल्याबद्दल त्यांनी विचार करावा, रावसाहेब दानवे यांची निवडणूकीच्या निकालानंतर प्रतिक्रिया

Raosaheb Danve And Uddhav Thackeray (Photo Credit: PTI)

Maharashtra MLC Election 2020 Results: राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक 1 डिसेंबरला पार पडल्यानंतर आता त्याचे निकाल समोर आले आहेत. या निवडणूकीत महाविकास आघाडी सरकारचा भाजपच्या विरोधात दणदणीत विजय झाला आहे. मात्र महाविकास आघाडी सरकारचा या निवडणूकीत विजय झाल्यानंतर मात्र विरोधकांकडून हल्लाबोल करण्यास सुरुवात झाली आहे. याआधी भाजप नेते चंद्रकांत पाटील आणि आता रावसाहेब दानवे यांनी टीका केली आहे. रावसाहेब दानवे यांनी असे म्हटले आहे की, शिवसेनेने विचार करावा की त्यांना नुकत्याच पार पडलेल्या निवडणूकीत एकाही जागेवर विजय का मिळवता आलेला नाही.(Maharashtra MLC Election 2020 Results: तिन्ही पक्ष एकत्रित लढल्याने विजय; एकटे लढण्याची हिंमत नाही, चंद्रकांत पाटील यांचा महाविकासआघाडीला टोला)

दानवे यांनी पुढे असे ही म्हटले आहे की, शिवसेनेने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विरोधात खुप काही गोष्टी बोलल्या आहेत. मात्र आता त्यांचे सरकार आहे. त्यामुळे त्यांचे संबंध त्यांच्यासह शरद पवार यांच्यासोबत सुोधारले आहेत. भाजप कोणताच प्रयत्न करणार नाही आणि त्यांचे सरकार स्वत:हून पडेल खोचक टीका दानवे यांनी केली आहे.(Maharashtra MLC Election 2020 Results: शिक्षक व पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीची सरशी, भाजपाला धक्का; पहा विजयी उमेदवारांची यादी)

दरम्यान, राज्यात पुणे, औरंगाबाद आणि नागपूर पदवीधर मतदार संघ तर पुणे आणि अमरावती शिक्षक मतदार संघासाठी निवडणूक पार पडली. तर महाविकास आघाडीतील तीन पक्ष म्हणजेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडून ही निवडणूक एकत्रित निवडणूक लढवली असून त्यांनी आपले उमेदवार रिंगणात उतरवले होते. त्याचसोबत तीन पक्ष मिळवून लढत असलेली ही पहिलीच निवडणूक होती. त्यामुळेच ठाकर सरकारसाठी ही निवडणूक अतिशय महत्वाची होती.