Maharashtra MLC Election 2020: राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठी महाविकासआघाडी सरकार आज शिफारस करण्याची शक्यता

तर शिवसेना पक्षाची नावे मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहेत. प्राप्त माहितीनुसार राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षातून शिफारस केली जाणारी संभाव्य नावे.

Maha Vikas Aghadi | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)Chhatrapati

साधारण गेल्या 3 महिन्यांपासून महाराष्ट्राच्या विधापरीषदेतील (Maharashtra MLC Election 2020) रिक्त असलेल्या राज्यपाल नियुक्त (Governor Quota) 12 जागा भरण्यासाठी सरकारने जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत. राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यातील सख्य पाहता निकषाचा मुद्दा उपस्थित होऊ नये यासाठी महाविकासआघाडी (Maha Vikas Aghadi) जोरदार प्रयत्नशिल आहे. अखेर, सर्व बाजूंनी विचार होऊन काही नावे निश्चित करण्यात आली आहेत. या नावांची यादी असलेला प्रस्ताव राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्याकडे आज सुपूर्त केला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, हा प्रस्ताव नेमका कधी पाठवला जाणार याबाबत समजू शकले नाही.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाची नावे निश्चित झाली आहेत. तर शिवसेना पक्षाची नावे मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहेत. प्राप्त माहितीनुसार राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षातून शिफारस केली जाणारी संभाव्य नावे. (हेही वाचा, Maharashtra MLC Election 2020: मंत्रिमंडळ बैठकीत राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठी प्रस्ताव मंजूर पण नावे अद्यापही गुलदस्त्यात)

राष्ट्रवादी काँग्रेस

काँग्रेस पक्ष

दरम्यान, शिवसेना पक्षातून कोणाला संधी दिली जाणार याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही. उर्मिला मातोंडकर सुनिल शिंदे (माजी आमदार) सचिन अहिर (माजी मंत्री) मिलिंद नार्वेकर(पक्ष सचिव) राहुल कनाल (युवा सेना), विजय आप्पा करंजकर ( जिल्हाप्रमुख ), भाऊसाहेब चौधरी (संपर्कप्रमुख, नाशिक), नितिन बानगुडे पाटील (उपनेते), अर्जुन खोतकर (माजी मंत्री) यांच्या नावांची चर्चा आहे. परंतू, त्यापैकी एकाही नावावर अद्याप तरी शिक्कामोर्तब झाले नसल्याचे वृत्त आहे.