OBC Reservation: 'सौ चुहे खाके बिल्ली हज को चली'; ओबीसी आरक्षणावरुन जयंत पाटील यांचा भाजपला टोला

यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील भाजपला टोला लगावला आहे.

Jayant Patil | (Photo Credits: Facebook)

ओबीसीचं राजकीय आरक्षण (OBC Reservation) रद्द झाल्याने भाजप राज्यभर 'चक्काजाम' आणि 'जेलभरो' आंदोलन करत आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) भाजपला (BJP) टोला लगावला आहे. भाजपचे आंदोलन म्हणजे 'सौ चुहे खाके बिल्ली हज को चली' असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. (OBC चे राजकीय आरक्षण टिकवण्याच्या मागणीसाठी भाजपचं महाराष्ट्र भर चक्काजाम आंदोलन सुरू)

"राज्यभरातील ओबीसी नेतृत्व ठरवून मोडीत काढणारा भारतीय जनता पक्ष आज राज्यभर ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन करत आहे. सौ चुहे खाके बिल्ली हज को चली," असं जयंत पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

जयंत पाटील ट्विट:

भाजपच्या आंदोलनात राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: सहभाग घेतला. केवळ राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाज आज अस्वस्थ आहे. केंद्र सरकारवर टीका करण्यात धन्यता मानणार्‍यांनी मुद्दामच या आरक्षणाचा बळी दिला असल्याचेही त्यांनी म्हटले. ओबीसी समाजाचे आरक्षण जोवर पूर्ववत होत नाही, तोवर हा संघर्ष असाच रस्त्यावर दिसत राहील. सातत्याने खोटे बोलणार्‍यांचा बुरखा जनतेसमोर फाटलाच आहे. आता जनतेचा त्यांना उत्तर देईल असेही ते म्हणाले. त्याचबरोबर आमच्या हाती सत्ता द्या. ओबीसींचे आरक्षण परत मिळवून देतो अन्यथा राजकीय संन्यास घेईन, असे जाहीर वक्तव्य फडणवीस यांनी यावेळी केले.

तर दुसरीकडे पंकजा मुंडे यांनी देखील राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. तुमच्या नाकर्तेपणामुळे आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत. 50 टक्क्यांच्या वरील लढाई सुरु असताना 50 टक्क्यांच्या आतलं आरक्षणही सरकारनं गमावलं. याची त्यांना लाज वाटायला हवी, अशा शब्दांत मुंडे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.